महिला महसूल सहाय्यकास शिविगाळ करणाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

खबरीलाल – अमळनेर(प्रतिनिधी) तहसील कार्यालयातील महिला महसूल सहाय्यकास शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला असून, महसूल कर्मचारी संघटनेच्या प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
     संजय गांधी शाखेतील महसूल सहाय्यक प्रियंका सुर्यवंशी यांना संदिप युवराज पाटील (रा. गलवाडे रोड) यांनी  अर्वाच्च भाषेमध्ये शिवीगाळ तसेच धमकी देऊन गलीच्छ भाषेचा वापर केला. या घटनेच्या निषेधार्थ अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संदीप पाटील, यास तहसील आवारात येण्यास मज्जाव करून संबंधितांविरुद्ध कार्यवाही होईपावेतो अमळनेर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद अंदोलन पुकारण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत अमळनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *