फेलोंसह संपूर्ण अमळनेकरांमध्ये उसळली तीव्र संतापाची लाट
खबरीलाल विशेष – अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाचे दुसऱ्या संस्थेच विसर्जन करण्याचा घाट संचालकांनी घातला असून यासंदर्भात एक फोलोने माहिती मागवली असता जोपर्यंत धर्मादाय आयुक्त मंजुरी देत नाही, तोपर्यंत तुम्हाला माहिती पुरवता येणार नाही, असे लेखी कळवले तर आम्ही तसे काहीच केले नाही, असे तोंडी सांगत कोल्हेकुई करीत संचालक लबाड लांडग्या सारखे ढोंग करीत खाशिला न बुडवण्याचा सोंग करीत आहेत. मात्र त्यांचा हा बनाव ‘खबरीलाल’ने उघड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली असून फेलोंसह संपूर्ण अमळनेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
खान्देश शिक्षण मंडळ सर्वाधिक जुनी आणि नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. ५ हजारावर मतदार आणि कोट्यावंधींची मालमत्ता असल्याने या संस्थेवर सातत्याने निवडुन येणाऱ्यांच्या त्यावर डोळा आहे. म्हणूनच कोणतीही गरज नसताना संचालकांनी जर काही कारणास्तव मंडळ विसर्जित करावयाचे असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट 1860 चे कलम 13 व 14 नुसार मालमत्ता सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट 1860 अन्वये सारखी उद्दिष्टेय असलेल्या दुसऱ्या संस्थेला कार्यकारी मंडळ व विशेष सर्वसाधारण संपूर्ण मिळकत हस्तांतरीत करण्यात येईल, असा ठराव करून खाशिचे अस्तित्वतच संपवण्याचा घाट घातला आहे. विद्यमान संचालकांकडून काहीतरी काळेबेरे शिजत असल्यामुळेच फेलो प्रसाद शर्मा यांनी १९ मार्च २०१९ रोजीच संस्था विलिकरणाचा घटना दुरुस्तीचा ५३ क्रमांकाचा ठरावासह अन्य विषयांची माहिती पदाधिकाऱ्यांकडे मागितली होती. परंतु सुरुवातीला असे काही केले नाही, असे तोंडी सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र शर्मा यांनी लेखी दिल्याने त्यावर उत्तर म्हणून मंडळाच्या अध्यक्षांनी व चिटणीसांनी शर्मा यांच्या अर्जाला बगल देत हा विषय सदरची घटना धर्मादाय आयुक्तांनी मंजुर केल्यानंतरच संस्थेस लागू होईल. त्यानंतरच ठरावाची रितसर प्रत देता येईल, असे पत्र १६ एप्रिल २०१९ रोजी दिले होते. याचाच अर्थ प्रसाद शर्मा यांना पूर्ण माहिती दिल्याने बवाल होईल म्हणून अध्यक्षंनी व चिटणीसांनी शर्मा यांना थर्ड मारत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. या ठरावात वावगे काही नाही असे संचालकांना वाटत असेल तर त्यांनी ठरावाची वाच्यता का होऊ दिली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला आहे. यातून ही संस्थाच बुडवण्याचा घाट संचालकांकडून सुरू असल्याचे आता फेलो आणि अमळनेरकरांकडून उघड बोलले जात आहे.
खोटारडे पणाचा आव
प्रसाद शर्मा यांनी खाशिच्या विलिकरणाचा घटना दुरुस्तीचा ५३ क्रमांकाचा ठरावासह अन्य विषयांची माहिती पदाधिकाऱ्यांकडे मागितली, पण असे काहीच नाही, असे सांगून त्यांची बोळवण केली असली तरी या विषयावर खुद्द मंडळाचे चिटणीस प्रा. डॉ.ए.बी. जैन यांनी धर्मादाय आयुक्तांना प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. त्यात संस्थेच्या विसर्जनाच्या विषयासह अन्य विषय बरोबर असून त्याच्या खरेपणा करीता सही करीत आहे, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. म्हणजेच पूर्णपणे खाशिला मातीत गाडण्याचा घाट कायदेशीररित्या पूर्ण करण्यात आला आहे. यातून पदाधिकाऱ्यांसह संचालक मंडळाचा खोटारडेपणा उघड झाला आहे.
ज्येष्ठ सभासादही झाले आवाक
खबरीलालने खाशिच्या विसर्जनाचे वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. कर्नोपकर्नी खबरीलालच्या वृत्ताची चर्चा झाली. हे वृत्त संचालकांमध्येही पोहचले. परंतु असे काहीच झाले नसल्याच्या भ्रमात असल्याने अनेकांनी हे वृत्त खोटे असल्याचा परस्पर दावाही केला. परंतु प्रत्यक्ष खबरीलालच्या पोर्टलवर जाऊन वृत्त वाचल्यानंतर आणि दिलेल्या पुरावे पाहून जेष्ठ सभासदही आवक झाले. याचा आता चांगलाच अभ्यास करावा लागेल, असे सहच बोलून गेले.