अमळनेर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून झालेल्या वादात चाकूने वार केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शहातील इस्लामपुरा भागात घडली. तर याचवेळी एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची माहिती पुढे आली. परंतु याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद करण्यात आलेली नव्हती. तर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील इस्लामपुरा भागात दोन जणात काहीतरी वाद झाल्याने एकाने हवेत दोन राऊंड फायर केल्याची माहिती शहरात वाऱ्यासराखी पसरली. तर यात दोन जण जखमी झाल्याची चर्चा होती. मात्र जखमींना चाकू लागल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी तिक्ष्ण हत्यार लागून रक्त सांडल्याचे दिसून येत होते. तसेच घटनास्थळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील, मिलिंद भामरे, शरद पाटील, रवी पाटील, दीपक माळी यांनी धाव घेतली. त्याठिकाणी दोन खाली राऊंड सापडल्याची माहितीही पुढे आली आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत असून इस्लमापुरात भागात तणापूर्ण वातावर असून पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या भागावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे.