लायन्स , नायरातर्फे झालेल्या त्वचारोग शिबिराचा १४४ जणांनी घेतला लाभ

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील लायन्स क्लब व नायरा क्लिनिकने घेतलेल्या  मोफत त्वचारोग शिबिरात १४४ जणांनी लाभ घेतला. शिबिरात जळगाव येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. स्वप्नील पाटील  यांनी १४४ पुरुष,महिला व मुलींची तपासणी केली. लायन्सचे प्रेसिडेंट विनोद अग्रवाल सेक्रेटरी योगेश मुंदडा, ट्रेझरर प्रसन्ना जैन,प्रोजेक्ट चेअरमन डॉ. मिलिंद नवसारीकर, शेखर धनगर, जितेंद्र जैन, प्रदीप अग्रवाल,प्रशांत सिंघवी,पंकज मुंदडा,पंकज वाणी,अनिल रायसोनी, डॉ. संदेश गुजराथी, महेश पवार,हेमंत पवार,चेतन जैन,माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर ला. डॉ. रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते.  यू. के. मेडिकलचे मालक नीलेश महाजन यांचे सहकार्य लाभले. आगामी काळात क्लबतर्फे भव्य आरोग्य शिबीर घेणार असल्याचे सांगितले विनोद अग्रवाल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *