
अमळनेर (प्रतिनिधी ) भरदिवसा घरफोडी करून पाच लाख ६५ हजार रुपयांचे सुमारे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना १६ रोजी दुपारी दीड ते साडे तीन वाजेदरम्यान शहरातील केशवनगर मध्ये घडली. याप्रकरणी पोलीस संशयितांचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की अमळनेर शहरातील केशवनगर मधील ज्ञानेश्वर वसंत वारुळे हा त्याच्या मुलीला व पत्नीला घेऊन धुळे रोडवरील दवाखान्यात आले असता तिकडे चोरट्यानी डाव साधत घराच्या मागील बाजूचे कुलूप तोडून घरात बेडरूम मध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील २ लाख २८ हजार रुपयांचे ५७.३२ ग्राम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट , २ लाख रुपये किमतीचा ५०.२० ग्राम वजनाचा सोन्याचा गोफ , ९२ हजार रुपये किमतीच्या २३.१५० ग्राम वजनाच्या दोन सोन साखळ्या , २० हजार रुपयांची ५ ग्राम सोन्याची अंगठी , १२ हजार रुपये किमतीचे ३ ग्राम सोन्याचे कानातले , १३ हजार रुपये किमतीचे ९भार चांदीचे ब्रेसलेट , ७ भार चांदीची साखळी असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव
घटनेचे वृत्त काळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे , अनिल भुसारे , शत्रुघ्न पाटील , सुनील हटकर , रवी पाटील , दीपक माळी यांनी भेट दिली असता घरमलकाने आधी ४० तोळे सोने चोरीस गेल्याचे सांगितले. मात्र पोलिसांच्या पाहणीत सुमारे २० तोळे सोने पोलिसांना आढळून आले जे चोरट्याना दिसले नाही. ज्ञानेश्वर वारुळे यांच्या फिर्यदिवरून अज्ञात चोरत्याविरुद्ध दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहेत.