पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून अटक करून मुलीला आईवडिलांच्या दिले ताब्यात

अमळनेर (प्रतिनिधी) देवळी शिवारात खडी मशीनजवळ राहणाऱ्याकडे पाहूणा म्हणून आलेल्याने दुचाकीसह ६ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी संशयिताला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील शितनेगाव येथून अटक करून मुलीला आई वडिलांच्या तांब्यात दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवळी शिवारातील खडी मशीन जवळ राहणाऱ्या अत्तरसिंग गेंदराम आर्या (पावरा) यांच्याकडे ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रकाश राजाराम डावर (रा. अंजनगाव सेंधवा) हा राहुल रमेश पावरा (रा. खवशी) यांच्यासोबत आला. दुपारी जेवन करून केल्यानंतर राहुल मोटरसायकल घेऊन निघून गेला. त्यांनतर प्रकाश डावर याने अत्तरसिंग याला तुमच्या मोटरसायकलवर तुमच्या सहा वर्षांची नातीला माझ्या नातेवाईकांकडे फिरवून आणतो असे सांगून मोटरसायकल (एमपी ४६ , एमएफ २९५९) घेऊन गेला. तो परत न आल्याने अत्तरसिंग याने खवशी येथे राहुल याला देखील विचारले असता प्रकाश आलाच नाही, असे सांगितले. त्यामुळे प्रकाशने मुलीचे अपहरण केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी तात्काळ एपीआय राकेशसिंग परदेशी , मिलिंद भामरे , राहुल पाटील , सिद्धांत शिसोदे यांच्या पथकाला मुलीच्या शोधासाठी रवाना केले. पथकाने आरोपीचा मागोवा घेत त्याला १५ रोजी रात्री धुळे जिल्ह्यातील शितनेगाव येथून मुलीसह ताब्यात घेतले. त्याला अटक करून मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तत्काळ केलेल्या कारवाईने कौतुक करण्यात येत आहे.