मुलाच्या लग्ना आहेर न स्वीकारता सैनिकांसाठी गोळा केला ध्वजनिधी

अमळनेरचे माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी राबवला विधायक उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) मुलाच्या लग्नात आहेर न स्वीकारता सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी निधी संकलनाचा उपक्रम माजी सैनिक किर्तिकुमार चौक यांनी राबवला. सेवानिवृत्ती नंतरही देश प्रेम व्यक्त करून आपल्या सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ध्वज निधी संकलनाचा राबवलेल्या उपक्रमाने त्यांच्यातील राष्ट्राभिमान दिसून आला.  ब्रम्हे गल्ली अमळनेरचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त सैनिक कीर्तीकुमार चौक यांचा संगीत विशारद मुलगा योगेश आणि चोपडा येथील  ऋतुजा वसंत जोशी हिचा विवाह धुळे येथे झाला. तर लग्न म्हटले की बँड , घोडा , रोषणाई , बाहेरची देवाण घेवाण यात प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते. मात्र माजी सैनिक किर्तीकुमार चौक यांनी   आपल्या मुलाच्या लग्नात  लग्नाचा आहेर न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. भारतीय सैन्यातील वीर सैनिक व कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधी दिना निमित्त निधी संकलनासाठी स्वतंत्र पेटी ठेवून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडींना आहेरा ऐवजी  भारतीय सैन्य साठी ध्वजनिधीची मदत जमा करणारे बॅनर लावून आवाहन केले व निधी संकलित केला. वऱ्हाडीनी देखील आनंदाने ध्वजनिधी देऊन सैनिकांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्याबद्दल असलेले प्रेम व राष्ट्रभक्तीचा परिचय एक सेवानिवृत्त सैनिक म्हणून त्यांनी पुन्हा करून दिला आहे.

वऱ्हाडींच्या मनात रुजवली देशभक्ती

याप्रसंगी वर व वधू पित्यांनी लग्नात कुठल्याही प्रकारचा आहेर न स्वीकारता त्याऐवजी ७ डिसेंबर हा दिवस ध्वज निधी दिवस होता यानिमित्ताने विर शहीद सैनिक, विर माता पिता, विर पत्नी, त्यांचे कुटुंबियांच्या कल्याणार्थ ध्वज निधीला मदत करण्याचे आवाहन करून प्रत्येक वऱ्हाडीच्या मनात देशभक्ती रुजवली. माजी सैनिकांच्या व दोन्ही परिवाराच्या या उपक्रमाचे नातेवाईक व वऱ्हाडीनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *