अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील शेतकी संघ जीन आवारातील वारुळाचे झाड तोडून नेल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकी संघ जीन आवारात ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरीफखान युसुफखान पठाण याने वारूळाचे झाड तोडून ट्रॅक्टर मध्ये घेऊन गेला. पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून १५ हजार रुपयांच्या झाडाची चोरी व झाड तोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.