शरद पवारांच्या वाढदिवासानिमित्त व्हर्चुअल रॅली, पक्ष प्रवेश सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅली आणि दिग्गज कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आमदार अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते. खासदार शरद पवारांच्या उपस्थितीत आगमी काळात शेतकरी मेळावा घेण्यावर चर्चा करण्यात आली.
अमळनेर शहरातील जि.एस.हायस्कूल येथील आयएमए हॉलमध्ये व्हर्च्युअल या रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आमदार अनिल पाटील यांनी येणाऱ्या काळात पक्षबांधणी व संघटन मजबूत करण्यावर भर देऊन, नगरपालिका, जि.प.व प.स. च्या निवडणुका डोळ्यामोर ठेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. पक्षात क्रियाशील असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच येथून पुढे नियुक्ती व तिकीट वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी केशवा आय.टी.व्हिजन चे गणेश भामरे व त्यांच्या टीम चा सलग दुसऱ्या वर्षी व्हर्च्युअल रॅलीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जि.प.,प.स. व नगरपालिकेच्या  इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी पक्षाच्या सर्वच फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक विनोद कदम यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी आभार मानले.

पक्ष सदस्यता मोहिमेला सुरुवात

 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार मतदारसंघात सदस्यता नोंदणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जि.प.सदस्या जयश्री पाटील यांची नोंदणी करून महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी पाटील यांच्या हस्ते त्यांचा फॉर्म भरण्यात आला. आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून याद्वारे महिला, युवक व वंचित घटकांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी जोडले जाणार आहे.

कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने बळ

शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मंगरूळ येथील शेतकी संघाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट दीपक बागुल, ग्रा.प.सदस्य बापू लोटन पाटील, वि.का.सो.संचालक जिजाब अभिमन पाटील, रमेश बागुल, भटू गोरख पाटील, सयाजी गणेश पाटील, कैलास पाटील, भटू पाटील, हिरालाल पाटील, अनिल पाटील, शशिकांत पाटील, देविदास बागुल, निंब येथील हिलाल छन्नू कोळी, पत्रकार व ओबीसी महासंघाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख जयवंत वानखेडे तसेच अण्णाभाऊ साठे ग्रुपचे प्रकाश बोरसे, हरीचंद्र कढरे, नारायण गांगुर्डे, बाजीराव कढरे, डॉ. राजेंद्र कांबळे, सुरेश कांबळे, ललित बोरसे, बापू जगदाणे, हरीचंद्र पाटील, मुकेश जाधव, आकाश अवचिते, विमलबाई गरुड, बापू चिंधा जगदाणे, इंदूबाई कढरे, मीराबाई कढरे, गंगाधर कढरे, पुष्पाबाई भालेराव, वत्सलबाई कढरे, शरद कढरे, दीपक गरुड, संतोष शिरसाठ, सागर आवाचिते, अनिल मरसाळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *