अमळनेर (प्रतिनिधी) चोरट्यांनी आता मोबाईल टॉवरही फोडण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जैतपीर येथील रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरची बॅटरी आणि त्यातील डिझेल चोरून डल्ला मारला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथे रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. यातील ७ हजाराची जनरेटरची बॅटरी आणि ८ हजार ८३५ रुपयांचे ९५ लिटर डिझेर चोरट्यांनी चोरून नेले. टेक्निशियन नानाभाऊ पाटीलने दि ६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जनरेटरमध्ये १५५ लिटर डिझेल टाकले होते. दि ९ डिसेंबर रोजी टॉवर बंद पडल्याचा फोन आल्याने त्याठिकाणी भेट दिली असता जनरेटरची बॅटरी चोरीला गेल्याचे आणि डिझेल ही कमी झाल्याचे दिसून आले. सुपरवायझर दादाभाई खलाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास पो. कॉ. किशोर पाटील करत आहे.