अमळनेर (प्रतिनिधी) येथील अंबाऋषी टेकडीवर रविवारी १२ डिसेंबर रोजी बारा निंब आणि एका वडाचे रोपण करून गोपिनात मुंढे यांची जयंती साजरी करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी गड्डे खोदणे, पाण्यासाठी चर निर्माण करणे, काटेरी झाडे तोडणे व पाणी व्यवस्थापनसाठी श्रमदान करून करण्यात आले.
निंबाची बारा रोपे प्रमोद लटपटे तर एक वडाचे रोप जगदीश वंजारी यांनी उपलब्ध करून दिले. समाजबांधवांची व अंबाऋषि टेकडी ग्रुपची अल्पोपहार व्यवस्था सर्व महिलांनी मिळून केली. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य जगदीश वंजारी यांनी दिले होते. अंबाऋषि टेकडी ग्रुप वृक्षारोपण व संवर्धन करणारे डॉ. अनिल वाणी यांचा सत्कार करण्यात आला. नगर परिषदेचे प्रमोद लटपटे, सोमनाथ वंजारी , एमइसीबीचे जगदीश वंजारी व सुनील कापसे, ग्रामीण रुग्णालयाचे युवराज वंजारी, ईश्वर सरपे व रामेश्वर दहिफळे, नवलभाऊ विद्यालयाचे रामेश्वर घुगे, कळमसरे महाविद्यालयाचे प्रा. सुनील गर्जे, प्रताप महाविद्यालयाचे विजय मांटे, रुक्मिणी महिला महाविद्यालयाचे तोंडे, पिंपळे आश्रमशाळेचे सतीश कांगणे उपस्थित होते. सूत्रसंचालनदिनेश पालवे यांनी केले. सुनील गर्जे यांनी आभार मानले.