खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

खबरदार, वादग्रस्त पोस्ट, संभाषण, व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट आणि स्टेटस ठेवल्यास!

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला दिला निर्वाणीचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी ) दोन धर्मात दंगल सदृष्य परीस्थिती निर्माण होईल वा दोन धर्मात तेढ निर्माण होतील तसेच कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशी कोणतीही वादग्रस्त पोस्ट, संभाषण, व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट, व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवल्यास तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा निर्वाणीचा इशारा पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,
दि. २५ नोव्हेंबर रोजी अमळनेर शहरातील एक हिंदु मुलगी दुस-या धर्माच्या मुलासोबत निघुन गेली आहे. म्हणुन अमळनेर शहरात दोन धर्मात धार्मिक तेढ निर्माण होवुन दंगलसदृष्य परीस्थिती निर्माण झाली होती.
त्याबाबत शहरात दगडफेक झाली व दुकाने बंद करत शहरात भितीचे वातावरण तयार होवुन त्यात एका इसमास एका अज्ञात व्यक्तीने दगड मारुन फेकल्याने जखमी केले यासह मुलगी मिसींग झालेबाबत याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तर वसीम मुश्ताक पटवे (रा. कसाली मोहल्ला, अमळनेर) याने त्याचे मोबाईलवर अमळनेर येथील दगडफेकचे चित्रण व विवादास्पद संभाषणाचा व्हीडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा अमळनेर शहरात जातीय तणाव निर्माण झाला आहे. म्हणुन अमळनेर शहर व परीसरातील नागरीकांना दोन धर्मात दंगल सदृष्य परीस्थिती निर्माण होईल वा दोन धर्मात तेढ निर्माण होतील वा कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल, अशी कोणतीही पोस्ट, संभाषण, व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट करु नये अगर व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच विवादास्पद पोस्ट व्हायरल करणा-यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button