खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

पिंगळवाडे येथून फारकत झालेली मुलगी झाली बेपत्ता

अमळनेर (प्रतिनिधी ) तालुक्यातील पिंगळवाडे येथून फारकत झालेली मुलगी हरवल्याची घटना १८ रोजी घडली. याप्रकरणी  मारवड पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंगळवाडे येथील  सोनाली राजेंद्र पारधी (वय २१) हिचे अनिल दाभाडे याच्याशी लग्न झाले होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी फारकत झाल्याने ती  माहेरी पिंगळवाडे येथे आई उषाबाई राजेंद्र पारधी यांच्याकडे राहत होती. दि. १८ नोव्हेंबर रोजी उषाबाई या मजुरी करून घरी आली असता मुलगी दिसून आली नाही. तसेच आजूबाजूला शोध घेतल्यावर ही दिसून आली नाही. तिच्या डाव्या हातावर एसए असे गोंदलेले असून सोबत दोन ग्रॅमचे सोन्याचे कानातले व ३५ हजार रुपये रोख असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून मारवड पोलिसात उषाबाई पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. सुनील अगोणे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button