खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

मराठी साहित्य संमेलनात डॉ.कुणाल पवार, शरद धनगर यांची गझल मुशारासाठी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) लोंढवे येथील डॉ. कुणाल पवार आणि करणखेडा येथील शरद धनगर यांची नाशिक येथे दिनांक ३ ते ५ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या गझल मुशायऱ्यात निवड झाली आहे. आयोजन समिती कडून दोघांनाही संपर्क करण्यात आला असून दिनांक ०४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ०७ वाजता गझल मुशायऱ्याला सुरुवात होणार आहे.
डॉ. कुणाल पवार हे खान्देश साहित्य संघ, शाखा जळगावचे जिल्हाध्यक्ष असून ते उत्कृष्ट अहिराणी व मराठी कवी तसेच गझलकार आहेत. ते सातत्याने दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम अमळनेर शहरात घेत असतात. तर शरद धनगर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार असून ते राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमात निमंत्रित असतात. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button