लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक पन्नालाल मावळे यांच्याशी भेट घेऊन केली समस्यांवर चर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी दाखल घेऊन लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अमळनेर येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेने वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींबाबत चर्चा करण्यासाठी विजय नाना पाटील आर्मी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी सोमवारी अमळनेर येथे आर्मी स्कूलला येऊन लोक संघर्ष मोर्चाचे विभागीय संघटक तथा आदिवासी पारधी विकास परिषदेचे खान्देश प्रांताध्यक्ष पन्नालाल मावळे यांच्याशी भेट घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात्मक समस्या बाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी सर्व तक्रारींची दखल घेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ह्या चर्चेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एकनाथ पाटील, आर्मी स्कूलचे प्राचार्य एस. यू. पाटील शिक्षक उमेश काटे उपस्थित होते.