<span;>*राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी जन्मदिन*
<span;>********************************
<span;>जन्म – नोव्हेंबर १८४८ (कलकत्ता)
<span;>स्मृती – ६ ऑगस्ट १९२५ (बराकपूर)
<span;>सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे थोर भारतीय नेते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक. जन्म कलकत्ता येथे. वडील दुर्गाचरण डॉक्टर होते. सुरेंद्रनाथांचे प्राथमिक व उच्च शिक्षण कलकत्त्यातच झाले. बी.ए. झाल्यानतंर इंग्लंडला जाऊन ते आय्.सी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले.
<span;>भारतात परतल्यावर त्यांची साहाय्यक दंडाधिकारी म्हणून सिल्हेटला नियुक्ती झाली पण त्यांच्या प्रशासनातील किरकोळ चुकांचा बाऊ करून ब्रिटिश सरकारने त्यांना नोकरीवरून काढले. त्या विरुद्ध त्यांनी इंग्लंड मध्ये जाऊन इंडिया ऑफिसकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. त्यांना बार ॲट लॉच्या परीक्षेसही परवानगी नाकारण्यात आली.
<span;>इंग्लंड मधील मुक्कामात एडमंड बर्क, जूझेप्पे मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या अशा अन्याय्य धोरणामुळेच त्यांच्या विरुद्ध जनमत जागृत करण्याची चळवळ त्यांनी हाती घेतली. कलकत्त्यातील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये (विद्यमान विद्यासागर महाविद्यालय) ते सुरुवातीस इंग्रजी विषयाचे अध्यापक होते. नंतर काही दिवस ते फ्री चर्च कॉलेज मध्ये होते. पुढे त्यांनी रिपन महाविद्यालय (विद्यमान सुरेंद्रनाथ महाविद्यालय) स्थापन केले. तेथेच अध्यापक म्हणून त्यांनी ३७ वर्षे घालविली तथापि राजकारणापासून ते अलिप्त नव्हते. जनजागृतीसाठी त्यांनी बेंगॉली हे इंग्रजी वृत्तपत्र काढले. त्यातून त्यांनी ५० वर्षे सातत्याने लेखन केले.
<span;>शिखांचा इतिहास तसेच भारतीय एकात्मता यांसारखे विषय हाताळून राष्ट्रीय जागृती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या वक्तृत्वाचा तत्कालीन बंगाली तरुणांवर व विशेषतः ब्राह्योसमाजातील अनुयायांवर एवढा परिणाम झाला, की ते सुरेंद्रनाथांच्या चळवळीत सहभागी होऊ लागले.
<span;>सुरेंद्रनाथांनी इंडियन ॲसोसिएशन ही संस्था स्थापन केली आणि तिच्या प्रसारार्थ भारतभर दौरा काढला. बेंगॉली या वृत्तपत्रातून कलकत्ता उच्च न्यायालयाची बदनामी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा देशभर हरताळ व निषेधाच्या सभा झाल्या. भारतीय सनदी सेवा परीक्षेचे किमान वय २१ वरून १९ वर आणण्यात आल्याने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी भारतभर प्रचार केला.
<span;>सुरेंद्रनाथांनी इंडिया ॲसोसिएशनतर्फे राष्ट्रीय सभा कलकत्त्यात बोलविली. यानंतर दुसरी सभा १८८५ मध्ये कलकत्त्यातच घेण्यात आली. राष्ट्रीय काँग्रेसचे ते दोनदा अध्यक्ष झाले. सुरुवातीपासून ते मवाळ पक्षात होते. बंगालच्या फाळणीला त्यांनी कडाडून विरोध केला आणि बहिष्काराचा जोरदार पुरस्कार केला.
<span;>सुरेंद्रनाथांना लो. टिळकांचा जहालवाद किंवा गांधींचा असहकार हे दोन्ही मार्ग मान्य नव्हते. द्विदल राज्यपद्धती असेलल्या बंगालच्या विधिमंडळावर त्यांची नियुक्ती झाली व लवकरच त्यांना ब्रिटिश सरकारने ‘नाइट’ हा किताब बहाल केला. १९२१-२३ दरम्यान त्यांची स्थानिक स्वराज्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. अखेरच्या दिवसांत त्यांची लोकप्रियता कमी झाली. बराकपूर येथे त्यांचे निधन झाले.
<span;>सुरेंद्रनाथांनी स्फुट लेखन बेंगॉली या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. त्याशिवाय त्यांनी ए नेशन इन मेकिंग : बिइंग द रेमिनन्सीस ऑफ फिफ्टी यीअर्स ऑफ पब्लिक लाइफ या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले.
<span;>सुरेंद्रनाथांनी भारतात विशेषत: बंगाल मध्ये राष्ट्रवाद जागृत केला आणि आपल्या अस्खलित वक्तृत्वाने त्याचा देशभर प्रसार केला. त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना ‘बंगालचा अनभिषिक्त राजा’ ही उपाधी बारिसाल देऊन करण्यात आला.
<span;>*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन*
<span;>********************************
<span;>जन्म – ३० एप्रिल १९०९ (अमरावती)
<span;>मृत्यू – १० नोव्हेंबर १९६८
<span;>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ यावली अमरावती येथे झाला.
<span;>माणिक बंडोजी ठाकूर हे त्यांचे नाव. अंगभूत गुणांमुळे आणि विवेकनिष्ठ जीवनदृष्टीमुळे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ या नावाने ओळखले जाणारे गेल्या शतकातले ते महान प्रबोधनकार होते.
<span;>त्यांच्या ठाकूर घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पुजन या गोष्टींची आवड निर्माण झाली. मराठी तिसरी पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला (जि.अमरावती) आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे किर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. एके दिवशी गुरूमहाराजांनी माणिकला ‘तुकड्या’ म्हणून हाक मारली व म्हटले, की ‘तुका म्हणे’ असे किती दिवस म्हणशील? ‘तुकड्या म्हणे’ असे म्हणत जा. ‘तुकड्या म्हणे’ या वाक्याने संपणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले. यामुळे ते तुकडोजी महाराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
<span;>ईश्वरभक्ती, सद्गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून हाताळले, म्हणूनच त्यांना जनतेने ‘राष्ट्रसंत’ अशी उपाधी देऊन गौरविले. ते गांधी आणि विनोबांचे शिष्य होते. त्यांनी खंजिरी घेऊन भजन करत देशभर हिंडून आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रबोधन केलं.
<span;>त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे.
<span;>तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. स्त्रीचं स्थान हे कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राष्ट्रव्यवस्थे मध्ये महत्त्वाचं आहे, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिलं. स्त्रीला अज्ञानात आणि बंधनात ठेवणं कसं अन्यायकारक आहे हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिलं. ईश्वरभक्ती करतानाच दुबळ्यांचीही सेवा करा, असं ते नेहमी सांगत. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रामविकासावरचा ग्रंथ प्रसिद्ध आहे.
<span;>राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे १० नोव्हेंबर १९६८ रोजी निधन झालं.
<span;>संत तुकडोजी महाराज यांची कविता :
<span;>या झोपडीत माझ्या
<span;>राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
<span;>ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
<span;>भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
<span;>प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
<span;>पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
<span;>दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या॥३॥
<span;>जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
<span;>भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
<span;>महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
<span;>आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
<span;>येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
<span;>कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
<span;>पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
<span;>शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
<span;>: ********************************
<span;>*❀ १० नोव्हेंबर ❀*
<span;>*निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन स्मृतिदिन*
<span;>********************************
<span;>जन्म – १५ डिसेंबर १९३२ (केरळ)
<span;>स्मृती – १० नोव्हेंबर २०१९ (चेन्नई)
<span;>भारताचे १०वे मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचा जन्म केरळ मधील पलक्कड जिल्ह्यातील तिरुनेलई मध्ये १५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नांव तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन होते. तामिळनाडूच्या १९५५च्या तुकडीतील ते IAS अधिकारी होते. भारताच्या निवडणूक व्यवस्थे मध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याचं श्रेय टी एन. शेषन यांना दिलं जातं.
<span;>अमेरिकेतल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी सार्वजनिक प्रशासनाची (Public Administration) पदवी मिळवली होती.
<span;>शेषन यांनी आदर्श निवडणूक आचार संहिता कठोरपणे राबवून निवडणूक सुधारणांसह भारतीय निवडणूक आयोगाला नवीन चेहरा देण्याचे काम केले.
<span;>शेषन हे वर्ष १९९० ते १९९६ पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी १९८९ मध्ये भारताच्या १८व्या कॅबिनेट सचिवपदाचा पदभार सांभाळला होता. १९९६ मध्ये त्यांनी सरकारी सेवेत दिलेल्या विशेष योगदानामुळे त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. मतदार ओळखपत्राची सुरुवातही त्यांनी केली होती. त्यांनी १९९७ मध्ये के.आर. नारायण यांच्याविरुद्ध राष्ट्रपतीपदाची आणि त्यानंतर दोन वर्षांनी काँग्रेसच्या तिकिटावर लालकृष्ण अडवाणी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती; परंतु, त्यांना यश आले नव्हते.
<span;>शेषन यांनी निवडणूक सुधारणांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय लोकशाही बळकट झाली. ते उत्कृष्ट अधिकारी होते. त्यांनी मेहनतीने आणि सचोटीने देशसेवा केली. तामिळनाडूत जन्मलेल्या या अधिकाऱ्याने भारतातील निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक सुधारणा केल्या. अर्थात शेषन यांना ते करताना प्रचंड विरोधही झाला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या निवडणुकीतील आमूलाग्र बदलांना विरोध केला, पण या गृहस्थाने कुठल्याही दबावाला बळी न पडता निवडणुकीत सुधारणा घडवून दाखवल्या, त्यामुळे आज ज्या काही निकोप निवडणुका होत आहेत, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त टी.एन. शेषन यांच्याकडे जाते. निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळापासून सुरू झाली. कधीही, कुठेही, कसाही प्रचार करणे, ध्वनिक्षेपणाचा अमर्यादित वापर अशांमुळे होणारा त्रास, याचा कुठेही विचार केला जात नव्हता, त्यालासुद्धा टी.एन. शेषन यांनीच चाप बसविला.
<span;>रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत प्रचार करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या जाहीर सभा, त्यामुळे वाहतुकीस होणारी अडचण, नागरिकांचा खोळंबा यावर कडक बंदी आणली गेली. रस्त्यावर कुठेही सभा न घेता सभांसाठी निवडणूक आयोग ठरवेल त्याच जागी सभा घेणे, प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा होणारा गैरवापर पूर्णत: बंद करणे, धर्माच्या नावावर, देवांच्या नावावर, राष्ट्रीय पुरुषांच्या नावावर मते मागण्यास त्यांनीच बंदी आणली. ध्वनिक्षेपक वापर रात्री १० नंतर बंद म्हणजे बंद. मग तो कुणीही असो. परवानगी नाही, असे अनेक बदल टी.एन. शेषन यांनी केले.
<span;>आयुक्त टी. एन. शेषन यांचं १० नोव्हेंबर २०१९ रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या ८६व्या वर्षी चेन्नईतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
<span;>********************************
<span;>*⚜═👬📚Students Self Study📚👬═⚜*
<span;>*🔽करेंट अफेयर्स एक पंक्ति में: 09 नवंबर 2021🔽*
<span;>Hindi Current Affairs One Liners: करेंट अफेयर्स एक पंक्ति को नए रूप में प्रस्तुत किया जा रहा है, इसमें 71वें ग्रैंडमास्टर, राष्ट्रीय कानूनी सेवा दिवस और कोरोना वायरस आदि को सम्मलित किया गया है.
<span;>• कर्नाटक सरकार ने मुंबई-कर्नाटक क्षेत्र का नाम बदलकर यह कर दिया है- कित्तूर कर्नाटक
<span;>• कर्नाटक की आदिवासी तुलसी गौड़ा को पर्यावरण के क्षेत्र में बेहतर काम के लिए जिस अवार्ड से सम्मानित किया गया है- पद्मश्री
<span;>• भारत के सबसे तेज 71वें ग्रैंडमास्टर जो बन गए हैं- संकल्प गुप्ता
<span;>• हाल ही में जिस शहर को यूनेस्कोर की क्रिएटिव सिटीज नेटवर्क (UNESCO Creative Cities) में शामिल किया गया है- श्रीनगर
<span;>• राष्ट्रीय कानूनी सेवा दिवस (National Legal Services Day) जिस दिन मनाया जाता है-9 नवंबर
<span;>• चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत 12 नवंबर, 2021 को जिस राज्य में cOcOn 2021 का उद्घाटन करेंगे- केरल
<span;>• भारत पर अपनी चौकसी बढ़ाने के लिए चीन ने पाकिस्तान को जो सबसे बड़ा युद्धपोत दिया है- PNS तुगरिल टाइप 054 ए/पी
<span;>• लॉजिस्टिक प्रदर्शन सूचकांक में जिस राज्य को पहला स्थान प्राप्त हुआ है- गुजरात
<span;>: *🌐GENERAL KNOWLEDGE🧠*
<span;>महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे
<span;>🔶भारताचे प्रवेशद्वार
<span;> मुंबई
<span;>🔶भारताची आर्थिक राजधानी
<span;> मुंबई
<span;>🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
<span;>मुंबई शहर
<span;>🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
<span;> रायगड
<span;>🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
<span;> रायगड
<span;>🔶मुंबईची परसबाग
<span;> नाशिक
<span;>🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
<span;> रत्नागिरी
<span;>🔶मुंबईचा गवळीवाडा
<span;> नाशिक
<span;>🔶द्राक्षांचा जिल्हा
<span;> नाशिक
<span;>🔶आदिवासींचा जिल्हा
<span;> नंदूरबार
<span;>🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
<span;>जळगाव
<span;>🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
<span;> यवतमाळ
<span;>🔶संत्र्याचा जिल्हा
<span;>नागपूर
<span;>🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
<span;>अमरावती
<span;>🔶जंगलांचा जिल्हा
<span;>गडचिरोली
<span;>🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
<span;> जळगाव
<span;>🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
<span;> अहमदनगर
<span;>🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
<span;> सोलापूर
<span;>🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
<span;> कोल्हापूर
<span;>🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
<span;>कोल्हापूर
<span;>🔶लेण्यांचा जिल्हा
<span;>औरंगाबाद
<span;>🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
<span;>औरंगाबाद
<span;>🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
<span;>बीड
<span;>🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
<span;> उस्मानाबाद
<span;>🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
<span;> नांदेड
<span;>🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
<span;>अमरावती.
<span;>—————————————-
<span;>
<span;>: *🌐GENERAL KNOWLEDGE🧠*
<span;>♻️ वाचा :- महाराष्ट्रातील महानगरपालिका
<span;>🔸 *एकूण महानगरपालिका* : *२७*
<span;>🔸नाव. – शहर – स्थापना 🔸
<span;>१) बृहन्मुंबई महानगरपालिका – मुंबई – १९८८
<span;>२) पुणे महानगरपालिका – पुणे – १९५०
<span;>३) नागपूर महानगरपालिका – नागपुर – १९५१
<span;>४) ठाणे महानगरपालिका – ठाणे – १९८२
<span;>५) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका – पुणे -१९८२
<span;>६) नाशिक महानगरपालिका – नाशिक – १९८२
<span;>७) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका कल्याण – १९८२
<span;>८) वसई-विरार महानगरपालिका – पालघर – २००९
<span;>९) औरंगाबाद महानगरपालिका – औरंगाबाद – १९८२
<span;>१०) नवी मुंबई महानगरपालिका – नवी मुंबई – १९९२
<span;>११) सोलापूर महानगरपालिका – सोलापूर – १९६४
<span;>१२) मीरा-भाईंदर महानगरपालिका -ठाणे – २००२
<span;>१३) भिवंडी-निजामपुर महानगरपालिका – ठाणे – २००२
<span;>१४) अमरावती महापालिका – अमरावती – १९८३
<span;>१५) नांदेड-वाघाळा महानगरपालिका – नांदेड -१९९७
<span;>१६) कोल्हापूर महानगरपालिका – कोल्हापूर – १९७२
<span;>१७) अकोला महानगरपालिका – अकोला – २००१
<span;>१८) उल्हास नगर महानगरपालिका – ठाणे – १९९८
<span;>१९) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – सांगली – १९९८
<span;>२०) मालेगाव महानगरपालिका – नाशिक – २००३
<span;>२१) जळगाव महानगरपालिका – जळगाव – २००३
<span;>२२) लातूर महानगरपालिका – लातूर – २०१२
<span;>२३) धुळे महानगरपालिका – धुळे – २००३
<span;>२४) अहमदनगर महानगरपालिका – अहमदनगर – २००३
<span;>२५) चंद्रपूर महानगरपालिका – चंद्रपुर – २०११
<span;>२६) परभणी महानगरपालिका – परभणी – २०११
<span;>२७) पनवेल महानगरपालिका – रायगड – २०१६
<span;>🔹 *सर्वात मोठी महानगरपालिका : बृहन्मुंबई*
<span;>🔸 *२७वी महानगरपालिका : पनवेल*
<span;>—————————————-