बळीराजा लोकोत्सव समितीने शहरातून बळीराजाची भव्य सवाद्य काढली मिरवणूक

अमळनेर (प्रतिनिधी) बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने शहरातून बळीराजाची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
शिरूड नाका येथे आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील,अर्बन बँकचे व्हाईस चेअरमन प्रविण पाटील, प्रा.सुभाष पाटील, मनोहर पाटील, प्रा.अशोक पवार, दिलीप पाटील ,कैलास पाटील यांनी बळीराजाच्या भव्य प्रतिमेचे पूजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन पाटील, एस. एम. पाटील, कृ उ बा संचालक विजय पाटील, नगरसेवक मनोज पाटील, रामकृष्ण पाटील, श्याम पाटील, निलेश साळुंके,यादव,संदेश पाटील,दिपक काटे,प्रशांत निकम,यांचेसह छाया सोनवणे, शशिकला पाटील, पूनम ठाकरे, मराठा सेवा संघाचे कैलास पाटील यांनी शेतकरी गिते सादर केली. मिरवणुकीच्या सुरुवातीस जेष्ठ कार्यकर्त्या वसुंधरा लांडगे  यांनी जिजाऊ वंदना गायली.सूत्रसंचालन प्रा.लिलाधर पाटील, विनोद कदम यांनी केले. मिरवणुकीच्या समारोप बळीराजा स्मारक येथे बळीराजा चे पूजन करून करण्यात आला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी आभार मानले.

या मार्गावरून निघाली मिरवणूक

मिरवणूक शिरूड नाका,वड चौक, बाळजीपुरा, वाघ बिल्डिंग, त्रिकोणी बाग, पाचपाऊली मंदिर, बस स्टँड, विश्राम गृह,तहसील कार्यालय मार्गे बळीराजा स्मारक पर्यंत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत काढण्यात आली.चौकाचौकात बैलगाडीवरील बळीराजा प्रतिमेचे महिलांकडून पूजन करण्यात आले. समारोपप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कदम, नगाव सरपंच महेश पाटील,शेतकी संघाचे संजय पुनाजी पाटील,शिव व्याख्याते रामेश्वर भदाणे,श्रीकांत चिखलोदकर, सयाजीराव कापडणे कर, डॉ.विलास पाटील, संजय सूर्यवंशी, आर पी पवार, पत्रकार मुन्ना शेख,लक्ष्मण महाजन आदींसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मिरवणुकीसाठी यांनी केले सहकार्य

 

मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी बळीराजा समितीचे दिलीप पाटील, संजयबाबा, शिवा पाटील, प्रकाश पाटील, गहिनीनाथ, उमेश ,अण्णा शेटे, संजय पाटकरी, अमोल पाटील,दत्तू  पाटील, रवि पाटील,बापूराव ठाकरे, अनंत सूर्यवंशी,आबा चौधरी, डॉ.युवराज पाटील, प्रदिप पाटील, नरेंद्र अहिरराव, अनिस शेख,लक्ष्मण पाटील,वाघ सर यांचेसह तरुण कुढापा मित्र मंडळ,जय अंबे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

<span;>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *