शहर विकासासाठी आमदार अनिल पाटील यांचा तीन कोटी रुपयांचा बंफर धमाका

दिवाळीच्या निधी भेटीने विकास कामांनी अमळनेर शहर उजाळून निघणार

अमळनेर (प्रतिनिधी) शहराच्या विकासासाठी आमदार अनिल पाटील यांनी दिवाळीतच तीन कोटी रुपयांच्या निधीची भेट दिली असून निधीच्या या बंफर धमाकाने आता शहर उजळून निघणार आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांना आपल्या भागात चांगली विकास कामे करता येणार आहेत.
शासनाच्या वैशिट्यपूर्ण १२ कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नगरपरिषदेस ३ कोटींच्या निधी वितरित करण्याचे शासन आदेश  दि १ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले आहेत. याच दिवशी वसुबारसाने दिवाळीला प्रारंभ झाल्याने हा अमळनेरकरांसाठी निधीचा दिवाळी धमाकाच आहे. आमदार अनिल पाटील यांनी यापूर्वी देखील वैशिट्यपूर्ण अनुदान आणि ठोक अनुदानातून पालिकेस साडेसात कोटीची कोटींची विकासकामे मंजूर केली असून त्यात आता अजून तीन कोटींची भर पडली आहे. याव्यतिरिक्त नगरपालिकेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अजून साडेतीन लाखांचा निधी मंजूर होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. तीन कोटींच्या विकासकांसाठी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी देखील मागणी केल्यानंतर आमदारांनी राज्याचे नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता.

अशी होणार शहरातील १२ विकासकामे

न.पा. हदीतील रा.मा.१५ ते मराठा मंगल कार्यालयपर्यंत रस्त्ता लगत दोन्ही बाजूला आर.सी.सी. गटारींसह रस्ता डांबरीकरण करणे ४० लाख,  शाहलम नगर येथे क्लब हाऊसचे बांधकाम करणे ४० लाख, प्रभाग क्र. ७ मधील महात्माफुले कॉलनीतीलअंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे २० लाख, प्रभाग क्र. ८ मध्ये प्रभाकर जानकीराम बडगुजर ते उदय हिम्मतराव पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे १० लाख, प्रभाग क्र.८ मधील एल.आय.सी. कॉलनी मध्ये रस्ते कॉक्रीटीकरण करणे  १० लाख, प्रभग क्र. ८ मधील राधाकृष्ण नगर मधील संजय ढोमण पाटील ते श्री. क.मा.साळुंखे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, प्रभाग क्र.६ मधील गट क्र. ३५८८ मध्ये प्रोफेसर कॉलनी भागात खुली जागा विकसित करणे २० लाख,प्रभाग क्र.८ मध्ये आदर्श नगर मधील रस्ते काँक्रीटीकरण करणे ७० लाख, अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभाग क्र. १४ मध्ये नागाईनगर भागात रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे  २० लाख,  प्रभाग क्र.७ मध्ये प्रसाद नगर भागातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे २० लाख,  प्रभाग क्र. ७ मध्ये आशिर्वाद नगर भागातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे  १५ लाख, प्रभाग क्र. १४ मध्ये आर.के.नगर भागातील रस्ते काँक्रीटीकरण करणे २० लाख रुपये आदी १२ विकासकामांचा समावेश आहे.

1 Comment

  1. मा. आमदार साहेबांना एक विनंती आहे की, त्यांनी मा. नगरसेवक प्रताप आबा शिंपी यांच्या घरापासून ते राजाराम नगर पर्यंत सुध्दा रस्ते बांधकाम करावे.
    मा. आमदार साहेबांनी निवडणूक पुर्वी जे आम्हा गोर गरिबा रहिवाशी जनतेला दिलेले आश्वासन पुर्ण करावे हीच आम्हा गोर गरीबांची दिवाळी समजण्यात येईल

    आदरपूर्वक

    राजाराम नगर मधील जनता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *