अमळनेर ( प्रतिनिधी ) त्रिपुरा येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ अमळनेर येथील मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड व नाशधुस करून धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाच्या घरांवर जाळपोळ व हल्लाही करण्यात आला. निष्पाप व गरीब लोकांची बळी गेले. हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारी घटना असून या घटनेच्या निषेध करून अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे व त्यांची धार्मिक स्थळांची संरक्षण करण्यात यावी आणि त्रिपुरा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व कडक कारवाई होवावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, अॅड. रज्जाक शेख, कमर अली शाह, रिसालत अली, अलीम मुजावर, आबिद अली सैय्यद, अॅड. अमजद शराफत अली, खान, कलीम शेख, मुस्तफा शेख, अॅड. अश्फाक सैय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.