माता ‘विद्ये’ची अशी कशी खुंटली मती, पोट चिरूनही मुलीची केली माती !

मुलीला कुकर्मात साथ देणाऱ्या मद्यपी वडिलांना ह्लदयविकाराचा बसला झटका

अमळनेर पोलिसांनी सहा तासातच संशयित मातेचा लावला छडा  

अमळनेर (प्रतिनिधी)  धुळे जिल्हा रुग्णालयात सिझर होऊन मुलगी झाल्याने डिचार्जसाठी चांदणी कुऱ्हे येथील महिलेने व तिच्या वडिलांनी गोंधळत घालत पळ काढला. त्यानंतर अमळनेर येथील बसस्थानकावर येऊन एक दिवसाच्या पोटाच्या ओल्या गोळ्याला अमळनेर बसस्थानकातील शौचालयाजवळ निर्दयीपणे कचऱ्यात फेकून दिल्याची ह्रदयद्रावक घटना ३१ ऑक्टोबर रोजी घडली होती. पोलिसांनीही अवघ्या सहा तासात या संशयित मातेचा छडा लावला तर तिला साथ देणाऱ्या मद्यपी वडिलांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याने याप्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे.
अमळनेर येथील बसस्थानकावरील शौचालयाजवळ एक दिवसाच्या मुलीला फेकल्याने डुकरे तिचे लचके तोडत असतानाच प्रवाशांना तिचा केविलवाणा टोहो ऐकून आला. त्यांचेही काळजी ते दृष्य पाहून पिळवटून गेले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जळगाव येथे हलवण्यात आले. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वांचेच काळीज चर्र झाले. संशयित मातेचा शोध घेण्यासाठी अमळनेर पोलिसांनी कंबर कसली आणि अवघ्या सहा तासात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय मच्छीन्द्र दिवे यांच्या पथकाने गर्भवती महिला कोणकोणत्या दवाखाण्यात तपासायला आल्या होत्या याची चौकशी केली. यातून संशयित महिलेचा बरोबर छडा लावला.

धुळे जिल्हा रुग्णालयात डिस्चार्जसाठी गोंधळ

अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शनिवारी तालुक्यातील चांदणे कुऱ्हे येथील विद्याबाई महेंद्रसिंग पाटील ही महिला आपल्या नातेवाईकांसोबत पोट दुखते म्हणून तपासणीसाठी आली होती. ती गरोदर होती. तर या आधीही तिची सिजर झाले होते. त्यामुळे जोखीम नको म्हणून तिला धुळे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार धुळ्याला तिचे सीझर करून प्रसूती करण्यात आली. तिला मुलगी झाली. त्यानंतर तिने व तिच्या वडिलांनी धुळे जिल्हा रुग्णालयात डिस्चार्जसाठी गोंधळ घातला होता. काही वेळाने त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला व अमळनेर बसस्थानकावर आल्यावर मुलीला निर्दयीपणे शौचालयाजवळ फेकून दिले होते.याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला जिवंत अर्भक फेकल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

सीझर झाल्याने अद्याप अटक नाही

पोलिसांनी आरोपी महिलेला अवघ्या सहा तासात निष्पन्न केले. मात्र तिचे सीझर झाले असल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान आरोपी महिलेचे वडील दत्तू बेणीराम पाटील हे दारू पित होते. ते अस्वस्थ  अवस्थेत पडलेले आढळून आल्याने गावकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना  त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *