विधी सेवा शिबिरात न्या. एस. बी. अग्रवाल यांनी मुलींना दिला सावधानतेचा सल्ला

अमळनेर (प्रतिनिधी) अनेकदा शाबासकी , प्रेरणा देताना विविध व्यक्ती आपल्याला स्पर्श करीत असतात. विद्यार्थिनींनी त्यांचा बॅड टच आणि गुड टच ओळखावा, असा सावधानतेचा सल्ला न्या. एस. बी. अग्रवाल यांनी मुलींना विधी सेवा शिबिरात मार्गदर्शन करताना दिला.
अमळनेर तालुका विधि सेवा समितीतर्फे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने तालुक्यातील पिंपळे येथील सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय मुलींसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर झाले. यावेळी सरकारी वकील अॅड. किशोर बागुल यांनी बाल न्यायालय , बाल गुन्हेगारी , भ्रमणध्वनीच्या खेळातून मुले गैर प्रकाराकडे वळत असल्याचे सांगून सावधानता कशी बाळगावी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच दिनेश पाटील, पिंपळे बुद्रुकच्या सरपंच दगुबाई पाटील, अॅड. राजेंद्र चौधरी, अॅड. आर. व्ही. निकम, अॅड. भारती अग्रवाल, मुख्याध्यापक सूर्यवंशी, योगेश पाटील, दिलावर चव्हाण, पोलीस पाटील दिलीप पाटील, राहुल पाटील, रुपाली पाटील, निलेश पाटील, अशोक मोरे, डी. बी. पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश पाटील यांनी केले.