अमळनेर (प्रतिनिधी ) चाकूचा धाक दाखवून बिअर घेऊन जात पुन्हा येऊन दमदाटी केल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील लुल्ला मार्केट मधील शहिद हेमू कलानी रोड वरील नंदकुमार रामचंद पंजवाणी यांच्या आराम गेस्ट हाऊस वर दादू एकनाथ धोबी याने ९ रोजी रात्री साडे नऊ वाजता चाकू दाखवून बियर घेऊन गेला. त्याच प्रमाणे पुन्हा २१ रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानांवर येऊन दमदाटी करून गेला म्हणून नंदकुमार पंजवाणी यांच्या फिर्यादीवरून दादू धोबी याच्याविरुद्ध जबरी लुटीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल कुमावत करीत आहे.