अमळनेर (प्रतिनिधी) उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघातर्फे धनगर जोडो समाज जोडो अभियानांतर्गत अमळनेर तालुका युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेर युवा तालुकाध्यक्षपदी भाऊलाल नवल हटकर व संपर्कप्रमुख पदी संदीप दिलीप मासुळे (रा. चोपडाई ता अमळनेर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार प्रणालीवर चालून व आरक्षण मिळवण्यासाठी सातत्याने ही संघटना काम करत आहे. भाऊलाल हटकर व संदीप मासुळे यांची निवड संस्थापक सल्लागार देविदास हटकर व अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी व धुळे जिल्हाध्यक्ष चेतनभाऊ, विठ्ठल मारनर, प्रविण हाके यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. या वेळी रमेश पवार, कृष्णकांत परदेशी, दुर्गेश खांडेकर उपस्थित होते.
rakesh.p3009@gmail.com