खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

चोर तर चोर वरून झाला शिरजोर,कापूस चोरून आत्महत्येची धमकी

अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील प्रकार, एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

अमळनेर (प्रतिनिधी )  नवीन बांधका सुरू असलेल्या घरात वाळण्यासाठी ठेवलेसी सुमारे दीड क्विंटल कपाशी एकाने चोरी केल्याची घटना तालुक्यातील शिरसाळे येथे घडली. संबंधिताला कपाशी चोरताना पाहिल्याने विषारी पदार्थ सेवान करून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने या प्रकरणी पोलिसांत कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरसाळ येथील शेतकरी  दिनेश अशोक पाटील (वय ३३) यांनी शेतातील कपाशी वेचली होती. परंतु पावसामुळे ओलसर निघत असल्याने ती वाळण्यासाठी गावचे पोलिस पाटील रामचंद्र बनजी चौधरी याच्या नवीन बाधंकाम चालू असलेल्या घरात खालचा भाग मोकळा असल्याने त्या जागी आणून वाळण्यासाठी ठेवली आहे. परंतु रोज थोडीथोडी कपाशी चोरी जात असल्याने ७ आॅक्टोबर रोजी लक्ष ठेवले असता रात्री ११.४५ वाजता गावातील विवेक विनोद पाटील कापूसू चोरताना आढळून आला. त्याला आवज दिल्यावर तो पळून गेला. तो पळून जाताना  आई अलक्काबाई अशोक पाटील , तसेच शेजारचे सुलोचनाबाई नारायण पाटील , योगेश मधुकर पाटील यांनीही पाहिले. दुसऱ्या दिवशी त्याला याचा जाब विचारल्यावर त्याने  विषारी औषध पिऊन तुझे नाव सांगेल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी दिनेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेक पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button