खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ब्रेकिंग

सेवेत कायम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांचा लढा, २ ऑक्टोबरला उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामरोजगार सेवकांना सेवेत कायम करावे, या मागणीसाठी २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीची सत्ता बदलताच ग्रामपंचायतीत ग्रामरोजगार सेवकांना कमी करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून त्यांना कायम सेवेत समावेश करावी, अशी मागणी करण्यात येत असून यासाठी उपोषण करण्यात येणार आहे. तर आमदार अनिल पाटील, तहसीलदार मिलिंद वाघ ,गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांना ग्रामरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र भाऊराव बाविस्कर (लोण सिम) , ज्ञानेश्वर राठोड (लोण चारम), रवींद्र पाटील (म्हसले), राकेश पाटील (पाडळसे), प्रमोद पाटील (तासखेडा), बळीराम पाटील (पिंगळवाडे), सुशील पाटील (भरवस), रामकृष्ण पाटील (रामेश्वर खुर्द), विलास पाटील (ढेकू सिम), भागवत सोनवणे (दहिवद), सूर्यकांत पाटील (सबगव्हान) या ग्रामरोजगार सेवकांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button