खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

वाहनातून मोबाईल, दागिणे चोरणाऱ्या अट्टल चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

आठ मोबाईलसह दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

 

अमळनेर (प्रतिनिधी)  वाहनांमधून रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या तांबेपुरा येथील अट्टल चोरट्यास पकडून विविध गुन्ह्यातील आठ मोबाईलसह दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
दीपक पांडुरंग भोई असे आरोपीचे नावा आहे. शहरातील तहसील कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या सतेज गुजराथी यांच्या चारचाकी (क्रमांक एमएच १८, डी ई ७८१६) मधून ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीस गेला होता. तसेच तहसील कार्यालयाच्या बाहेरूनच मारवड येथील योगेश आधार पाटील यांच्या चारचाकीतून (क्रमांक एमएच १९, बी ९९८९) सुमारे सव्वा लाखाचे दागिने लंपास झाले होते. तर जपान जीन जवळ उभ्या असलेल्या वाहनातून (एमएच १९, एए ४०१९)  निलेश रघुनाथ महाजन यांचे १३ हजार रुपये लंपास झाले होते.

उधळपट्टी केल्याने अडकला जाळ्यात

तांबेपुरा येथील दीपक पांडुरंग भोई यांच्याकडे महागडा मोबाईल असून तो खूप पैसे खर्च करीत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यावरून त्यांनी हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, दीपक माळी, रवींद्र पाटील यांना पाठवले असता दीपक याच्याकडे काही मोबाईल व घरात सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच दीपकने गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने व आठ मोबाईल असा एकूण १ लाख ४३ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे. याकामी हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील , पोलीस नाईक शरद पाटील, पोलिस नाईक हितेश चिंचोरे यांचे सहकार्य लाभले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button