खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
महत्वाचे

अंगणवाडीत मुलांना चित्रकला साहित्य वाटप करून अस्मिता ग्रुप मुलांच्या चेहऱ्यावर फुलवले हसू

अमळनेर (प्रतिनिधी) येथील अस्मिता ग्रुपतर्फे  गांधळीपुरा येथील २ अंगणवाडीमध्ये ५५ -६० छोट्या मुलांना चित्रकला साहित्यचे वाटप करण्यात आले. त्यात वेगवेगळे चित्र रंगवण्यासाठीची पुस्तिका आणि रंगपेटी देण्यात आली. यामुळे या मुलांच्या चेहर्‍यावर हसू फुलवले. नवे साहित्य मिळाल्याने ते हरखून गेले.
दरवर्षी अस्मिता ग्रुप अमळनेरतर्फे नगरपालिका शाळामध्ये शालेय साहित्य वाटप केले जाते. यंदा गांधळीपुरा येथील २ अंगणवाडीमध्ये चित्रकला साहित्य वाटप केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अस्मिता ग्रुप संचालिका विद्या हजारे , तत्कालीन अध्यक्षा  प्रतिमा कुलकर्णी , सचिव  अनुपमा जैन, राधा नेतले यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अस्मिता ग्रुप सदस्या हेमा छाजेड , दीपा कटारिया, रुपाली भावसार , मेघा कुलकर्णी , चंदा वैद्य , पूजा उपासनी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button