खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

दाऊदी बोहरा समाजतर्फे स्वच्छता दिन व वृक्षारोपणाचा कार्यक्रमातून पर्यावरणाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी )येथील दाऊदी बोहरा समाजतर्फे रविवारी १९ सप्टेंबर रोजी पैलाड भागातील स्मशानभूमीत सैफी बाग येथे स्वच्छता अभियान अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात  मुस्तफा सैफी या मुलाने कुराण पठाणाने केली. याप्रसंगीप्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व  उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड व इंजिनीयर अमोल भामरे, बांधकाम सभापती सुरेश बापू पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल व विनायक मराठे हे उपस्थित होते.   बोहरा समाजातर्फे पाहुण्यांच्या सत्कार समाजाचे अध्यक्ष शेख एहसान भाई बुरर्‍हानी, सचिव शेख मोहम्मद भाई करमपुरवाला व मु. अब्बास भाई यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षिका रशिदा  सैफी, अहमद बुर्‍हानी खोजेमा सैफी, हुझेफा इझी, अजिज बोहरी फरीदा करू यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन मकसूद बोहरी यांनी केले

मुलांनी स्वच्छतेचे सांगितले महत्त्व

याप्रसंगी हुसामिया मदरसातील विद्यार्थी व लहान बालकांनी घरात व मोहल्ल्यात कशाप्रकारे स्वच्छता राखावी याची उत्कृष्ट अशी कविता सादर केली.
ऊबे  सैफी याने आपल्या आजूबाजूच्या परिसर व घर कसे स्वच्छ ठेवता येईल, याबद्दल उपयुक्त माहिती दिली व आपल्या जीवनात झाडांचे महत्त्व विशद केले. तसेच वरील सर्व कार्य हे आमचे धर्मगुरु सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन  (त .ऊ .श.)यांचे प्रेरणेनेवआशीर्वादाने होत असल्याचे त्याने सांगितले.

जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे


मार्गदर्शनात मुख्याधिकारी सरोदे यांनी सांगितले की घरातील केरकचरा व गल्लीबोळात साफसफाई कशी ठेवावी, हात वगैरे कसे स्वच्छ धुवावेत व  तनमन कसे शुद्ध ठेवावे कसे शुद्ध ठेवावे याबद्दल बालकांनी सादर केलेली कविता अतिशय सुंदर होती. आज आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भागत आहे याकरिता जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे  व सजग व्हावे याकरता प्रत्येक या बालकांनी केलेले प्रयत्न फारच मोलाचे आहेत व त्यांना याची जाणीव आतापासूनच झालेली आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

चित्रकला स्पर्धेत अब्देअली बुकवाला प्रथम

कार्यक्रमाच्या शेवटी  स्वच्छता अभियाना  विषयावर चित्रकला स्पर्धा  घेण्यात आली होती. यात अब्देअली बुकवाला यास प्रथम तर बुरहानुद्दिन सैफी द्वितीय बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी २१ रोपांचे वृक्षारोपण प्रमुख पाहुण्यांच्या व बालकांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button