खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

ताडेपुरा परिसरात गटारीचे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात

अमळनेर (प्रतिनिधी) ताडेपुरा परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यालगत बांधलेल्या गटारींमुळे पाण्याचे डबके साचून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आहे. यावर तात्काळ उपयोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकानी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील टाकरखेडा रस्त्यावरील ताडेपुरा भागात मारोती मंदिराजवळच पाण्याचे डबके साचले असून परिसरातील गटारींचे हे सांडपाणी आहे. मंदिराला लागून राज्य मार्गासह बेटावद पाळधी रस्ता असून कडेला याच विभागामार्फत गटारींचे काम सुरू आहे. मात्र या गटारी नियोजन शून्य बांधल्याने परिसरातील सांडपाणी उलट या बांधकामामुळे अडवले जात आहे त्यामुळे डबके साचून डास, कीटक वाढले आहेत. डेंग्यू , मलेरियाचे रुग्ण वाढले असल्याने या पाण्याचा निचरा करण्यात यावा. तसेच सार्वजनिक शौचालय धुण्यास पाण्याची गाडी पाठवण्यात यावी, बंद पथदिवे सुरू करावेत, रस्ते गटारी सुविधा करण्यात याव्यात, अशा मागण्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केल्या असून आजारातून अनर्थ घडल्यास पालिका जबाबदार असण्याचा इशारा देण्यात आला आहे.  निवेदनावर किरण बहारे , अर्जुन संदानशीव,  विद्यानंद बिऱ्हाडे , सुधाकर सरदार , रमेश संदानशीव, किशोर संदानशीव , श्रावण संदानशीव, योगेश संदानशीव, गणेश संदाशीव , योगेश पवार ,हिम्मत संदानशीव, कमलबाई शिंपी , मारुती वैदू , अमृत सोळुंखे, मयाराम शिरसाठ , तुळशीराम हातगंडे , देवमन भिल, सुरेश हाताडे , संजय चौधरी , गोविंदा वैदू आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button