अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षक दिनानिमित्ताने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे रविवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील शिक्षक व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
यात शिरसाळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे, सरस्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक रणजित शिंदे, के. डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदा नेतकर, जि. प. शाळा पिंगळवाडेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे. तंत्रस्नेही शिक्षक भूषण महाले, अशोक पाटील, मनीषा पाटील, प्रेमराज पवार, जयश्री पवार, खेमचंद पाटील,अश्विनी पाटील, विजय पाटील, विलास पाटील, भैय्यासाहेब साळुंके, निरंजन पेंढारे ,अर्चना बागुल, नितीन संदानशिव या शिक्षकांचा शिक्षक गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आर्टिस्ट विजय पवार, भोंगा चित्रपटात अभिनय असलेले विनय जोशी, फोटोग्राफर हेंमत पवार यांचा सत्कार करण्यात आला. धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.डी. डी.पाटील, धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे चेअरमन तथा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष के .डी. पाटील, सचिव राधेश्याम पाटील, पांडुरंग पाटील, संचालक नंदकुमार पाटील, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार उपस्थित होते. प्रा.लिलाधर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.