◆ व्हॉटस्अॅप कॉलवरील ललनांचा “नग्न” डाव, तुमच्या सुखी जीवनावरच घालेल घाव..

● अमळनेरातही अनेकजण अडकले मदमस्त ललनाच्या कॉल जाळ्यात

अमळनेर (खबरीलाल विशेष) फेसबुकची सहज सफरींग करताना तिचा ‘हाय’ मेसेज आल्यावर अनेकांना गुदगुल्या होतात… ओळख ना पाळख तरीही तिचा मदमस्त असणारा फोटो यांचे होश उडवतात… तिच्या डोळ्यांची घायळ करणारी नजर…दातात अडकवेलला लालजर्द ओठ… लालबुंद गाल…आणि याच गालावरून लोंबकळणारी काळीभोर नाजूक बट मदहोश करते…आणि येथेच अनेकांचे उडतात होश….काही कळायच्या आतच इकडूनही होतो हाय…आणि सुरू होतो मोबाईलवरच काही क्षणात मदनाचा खेळ… तुम्हाला उघडे, नागडे करण्याचा….!
मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर चांगला की वाईट यावर नेहमीच बोलले जाते. पण आपली फसवणूक कशी होते, याची माहिती अनेकांना नसल्यामुळेच ते फसत जातात. कारण जे फसले आहेत, ते बदनामीच्या भितीने तक्रारीसाठी पुढे येत नाही म्हणून फसवणारेही अनेकांना फसवतच असतात. म्हणून ‘खबरीलाल’ने सोशल मीडियावर अश्लिलतेच्या जाळ्यात आपल्याला कसे फसवले जाते, याची वस्तूस्थिती मांडत आहे. आज प्रत्येक घरात एका पेक्षा अधिक अॅनरॉईड मोबाईल आहेत. त्यात फेसबुक, व्हॉटस्अॅपसह आदी सोशल मीडियाचा वापर अधिक होत आहे. यातूनच फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार सामोर येत आहेत. आता तरी महिला आणि तरुणींनी ऑनलाइन सेक्सच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग करून पैसे कमवणे सुरु केले आहे. पोटाला भूक असते तशीच सेक्स ही नैसर्गिक भूक आहे. मात्र ती उघड करणारी गोष्ट नसल्याने त्यावर कोण किती आणि कसे कंट्रोल करतो, त्यावर समाजात त्या माणसाचे चरित्र ठरते. हीच नाजूक नस पकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

■ ती फक्त तिचे टी-शर्ट अर्धवट उचकवते…


फेसबुक चाळत असताना आपल्याला मेसेंजरने हाय असा मेसेज येतो. आपली ओळख नसली तरी मानवी स्वभाव म्हणून आपणही तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात करतो. ती चॅटिंगमध्ये आपणास गुंतवणून हळूच तुम्ही सिंगल आहात का, असे विचारते आणि व्हिडिओ कॉलवर मस्ती करायची का, अशी ऑफर देते. आपण हो म्हटले की, लगेच व्हॉटस्अॅप नंबर मागते. त्यावर व्हिडीओ कॉलनिंग करून ती कपडे उतरवत असल्याचे सांगून आपल्यालाही आपले सर्व कपडे उतरवण्यास सांगते. ती फक्त तिचे टीशर्ट अर्धवट उचकवते. आपण जोशात होश हरवून बसल्यामुळे सर्व कपडे उतरवतो आणि येथेच घात होऊन ती आपली नेकेड व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग ने शूटींग करून घेते. आपण तिच्या सौंदर्याला भूलून मदहोश असतो. तिची नजाकत अदाने आपण घायाळ झालेलो असतो. किती मजा आली, परोमोच्च सुखाचा बिंदू गाठल्याचा मनाला समाधानी मानतो. तिकडे मात्र ती तुमचा क्रियाक्रम कसा करायाचा याचा प्लॅनिंग करते आणि तिच्याच स्वप्नात आपण काही दिवस घालतो….
काही दिवसांनी जवळच्या व्यक्तीचा आणि मित्राचा फोन येतो.. तुझा निकेड व्हिडोओ, फोटो मला सोशल मीडियावर आले आहेत. त्यानंतर हा भानावर येतो. याच्या मदानाची धुंदी लगेच उतरते. काय करावे ?, कसे करावे ? आणि हे व्हिडिओ, फोटो कसे डिलिट करावेत ? याचा विचार करू लागतो. तेवढ्यात त्याच ललनाचा पैशांसाठी मेसेज येतो. ती काही रक्कम मागते. आपण ती देतो. तिची लालसा वाढत जाते, ती पुन्हा पुन्हा पैशांची मागणी करते आणि आपल्याला कंगाल करून सोडते. एका ‘हाय’ने त्याला लागलेली ‘हाय’ कीती महागात पडली हे त्याच्या लक्षात येते पण याला फार उशिर झालेला असतो….

● बदनामी, भितीपोटी तक्रारी नाही…

अमळनेरातही अनेकांबाबतीत असे प्रकार घडले आहेत. यात काही तरुण आहेत. काही नोकरदार, उच्चशिक्षितही आहेत. आपल्याकडून भावनेच्या भरातका होईना चूक झाली आहे. लुटलो गेलो आहोत. म्हणून कोणत्या तोंडाने तक्रार करायची, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणले, म्हणून अशा ‘नग्न’ झालेल्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण ‘नगण्य’ आहे. त्यामुळे फसवणारे मोकाटच असतात. ते रोज नवे सावज शोधत असतात. त्यात दिवसातून एकही जण अडकला तरी त्याची तिजोरी खाली होऊन तिची तिजोरी भरली जाते. म्हणून किमान भान राखून सोशल मीडियाचा वापर करणे आवश्यक आहे.

■ अनोळखी महिलेशी करू नका चॅट

सोशल मीडियाचा दूर उपयोग करून फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना अनोळखी महिलेशी चॅट करून नये, कदाचित ते अकाऊंट हॅकरने महिलेच्या बनावट नावानेही उघडले असू शकते. त्यामुळे यात आपली पुरेपूर फसवणूक होऊ शकते. म्हणून खबरीलाल या वृत्ताच्या माध्यमातून जनतेला आवाहन करते की, व्हॉटस्अॅप आणि फेसबुकवर कोणत्याही अनोळखी महिलेशी व व्यक्तीशी चॅट करू नका, अन्यथा तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून खबरीलालने अशा वेगळ्या विषयाला हात घालून जनतेच्या समोर आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *