अमळनेर(प्रतिनिधी) अखिल राष्ट्रीय भांतू सांसी समाज विकास संस्थेतर्फे नगरपालिकेला निवेदन देत कंजरभाट समाजाची स्मशानभूमी तत्काळ विकसित करावी, अशी मागणी अखिल राष्ट्रीय भांतू सांसी समाज विकास संस्थेर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अमळनेर येथील ताडेपुरा कंजरभाट समाजाची स्मशानभूमीची बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्याात व अनेक वर्षापासून याकडे कुणाचे लक्ष नाही. दयनीय अवस्था असून विज नाही, येण्या जाण्यासाठी रस्ता नाही. बसण्यासाठी ओटा नाही. शेड नाही. त्यामुळे अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत करावी लागते. म्हणून या ठीकाणी रस्ता तयार करण्यात यावा, बसण्यासाठी शेड उभाण्यात यावे. अंत्यविधीसाठी ओटा बांधवा. वीजपुरवठा करून संरक्षणासाठी वॉल कंपाऊंट तयार करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन देताना मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी यांनी सदर कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे .यावेळी राजेश माछरे सूरज कंजरभाट , राहुल कंजर , रमेश तिलंगे , अशोक माछरे , शशि बागड़े , विकी अभंगे कृष्णा अभंगे , विशाल कंजर , सरजू अभंगे इतर समाज बांधव उपस्थित होते