अमळनेर (प्रतिनिधी)मारवड पोलिसांनी तालुक्यातील दोधवद येथे छापा टाकून ३५ लिटर गावठी दारून पकडून कारवाई केली. मात्र संशयित आरोपी हा पोलिसांना पाहून दारूचा कॅन सोडून फरार झाला.
मारवड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तालुक्यातील दोधवद येथे छापा टाकला. या वेळी ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत झाडा झुडपात ज्ञानेश्वर गंभीर सैंदाणे हा गावठी दारूची हातभट्टी चालवताना आढळून आला. मारवड पोलिस स्टेशनचे फिरोज बागवान, सुनील आगवणे, सुनील तेली यांनी छापा टाकून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तेथे ३५ लिटर दारू असलेला प्लास्टिक कॅन आढळून आला. मात्र तो पळून गेला. पोलिसांनी माल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.