खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर फुटबॉल क्लबतर्फे राष्ट्रीय क्रीडा साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर अमळनेर फुटबॉल क्लबतर्फे राष्ट्रीय क्रीडा साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित लहान मोठ्या खेळाडूंनी खेळाचे प्रात्यक्षिक व खेळ करून दाखविले.
क्लबचे मुख्य प्रशिक्षक अर्शद शेख व सहकारी प्रशिक्षक वसीम शेख यांनी क्रीडा दिनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी नपचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड,प्रतापचे वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा.सचिन पाटील, अमळनेर फस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप सराफ, क्रिकेटर मिलिंद शिंदे, प्रतापचे जिमखाना प्रमुख डॉ.विजय तुंटे, हॉकीचे विद्यापीठ खेळाडू पंकज डंबेलकर यासह खेळाडू उपस्थित होते.दरम्यान अमळनेर फुटबॉल क्लब च्या माध्यमातून अनेक बालके फुटबॉल तथा मैदानाकडे आकर्षित होत असून प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सायंकाळी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button