खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला मुलीसह चांदवड तालुक्यातून घेतले ताब्यात

मुलीच्या जाबजबाबवरून तरूणविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया

 

अमळनेर (प्रतिनिधी ) येथील बसस्थानकावरुन अल्पवयीन मुलीला   पळवून नेणाऱ्या तरुणाला मुलीसह चांदवड तालुक्यातून शेतातून अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना अमळनेर येथे आणले असून मुलीच्या जाबजबाबवरून तरूणविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर येथील बस स्थानकावर एक वृद्ध महिला आपल्या अल्पवयीन नातीला मुलीला भेटायला घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर आली  होती. त्या मुलीने लघुशंकेला जाऊन येते असे सांगून मुलगी गायब झाली. तिचा शोध घेतला असता ती एका तरुणाबरोबर मोटरसायकल (क्रमांक एमएच- १८ बीपी- ९३०७) वर एका तरुणाबरोबर निघून गेल्याची माहिती मिळाली. ही मोटरसायकल गोपीचंद बारकू पवार (रा .डाबली धांदरने ता शिंदखेडा) या तरुणाच्या ताब्यात होती.  काही दिवसांपूर्वी त्यानेच तरुणीला पळवून नेणार असल्याचे वक्तव्य केले होते, असे आजीने संगीतल्यावरून आजीने अमळनेर पोलीस स्टेशनला गोपीचंद पवार यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस नाईक दीपक पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

 

पिआय हिरे यांनी प्रकरण घेतले गांभीर्याने

गेल्या अनेक दिवसांपासून मुली पळवण्याचे व पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस नाईक दीपक माळी , शरद पाटील, रवी पाटील , हितेश चिंचोरे यांच्या पथकाला  मागावर पाठवले. आरोपी देवळा तालुक्यात गेल्याचे समजले. तेथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने तो वाझगाव येथे शेतात लपला असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

आणखी दोघांनाही ठोकणार बेड्या

दोघांना अमळनेर आणल्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मुलीला पळवण्यासाठी आणखी दोघांची मदत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या जाबजबाबवरून आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button