खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिक्षणमहर्षी व.ता पाटील पुण्यस्मरणार्थ शिबिर ६०० जणांची केली तपासणी

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षणमहर्षी व.ता पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ जयऋतूकमल हॉस्पिटल व आय. सी. यु नवी मुंबई संचलित मोरया मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल अमळनेर येथे महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. ६००हून अधिक लोकांनी लाभ घेतला.
उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात विविध आजारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ह्दयरोगतज्ञ डॉ. श्रीकांत वसंतराव पाटील, डॉ. ज्योती श्रीकांत पाटील मधुमेहतज्ञ, डॉ.दिनेश सी. महाजन स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ञ डॉ.दीपक विजय धनगर, फुफ्फुस विकार तज्ञ, डॉ.पंकज चौधरी शल्यचिकित्सक तज्ञ यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. किशोर पाटील अॅपरिका लॅब , प्रवीण बावस्कर सन फार्मा ,संदीप भालेराव (लॅब),आकाश माळी, धनंजय भदाणे, नंदिनी राजपूत हे मोरया हॉस्पिटल सहकारी व त्यांच्या स्टाफ, जयरऋतूकमल हॉस्पिटल मुंबई स्टाफ,स्रियांच्या तपासणीसाठी डॉ. अश्विनी महाजन उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button