खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

आजी सोबत आलेल्या अल्पवयीन नातील दुचाकीवर घेऊन तरुण फरार

अमळनेर (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील एका तरुणाने अमळनेर बसस्थानकावरून आजी सोबत आलेल्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर पळवून नेल्याची घटना २५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे पुन्हा पोलिसांची मुलीच्या शोधासाठी डोकेदुखी वाढली आहे.
याबाबत अधिक माहिती अशीकी, एका वृद्ध महिला आपल्या अल्पवयीन नातीला मुलीला भेटायला घेऊन जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. या वेळी तिची नात लघुशंकेला जाऊन येते असे सांगून गायब झाली. बराच वेळ झाल्यानंतरही नात न आल्याने आजी व नातेवाईकांनी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती मुलगी मोटरसायकल (क्रमांक एमएच- १८, बीपी- ९३०७ ) वर एका तरुणाबरोबर निघून गेल्याची माहिती मिळाली. ही मोटरसायकल गोपीचंद बारकू पवार (रा. डाबली धांदरने ता. शिंदखेडा) या तरुणाच्या ताब्यात होती आणि काही दिवसांपूर्वी याच मुलाने तरुणीला पळवून नेणार असल्याचे वक्तव्य केले होते, असे आजीने संगीतल्यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात गोपीचंद पवार यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button