खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

धुळे येथील एसआरपीएफ जवानाला तिघा लुटारूंनी पिस्तूल लावून लुटले

धुळे रोडवर जवानाच्या दुचाकीला लाथ मारून थांबवत पाकीट, मोबाईल लुटला

 

एसआरपीएफ जवानालाच लुटल्याने लुटारूंनी पोलिसांनाच दिले आव्हान

अमळनेर (प्रतिनिधी ) अमळनेर येथून नातेवाईकाच्या अंत्यविधी आटोपून परत जाणार्‍या धुळे येथील एसआरपीएफ जवानाच्या दुचाकीला लाथ मारून तिघा लुटारूंनी पिस्तूल डोक्याला लावून रोख रकमेसह मोबाईल लुटल्याची खळबळजनक घटना जानवे गावाच्या अलीकडे 25 रोजी रात्री 10.45 वाजता घडली. एका एसआरपीएफ जवानालाच लुटल्याने लुटारूंनी पोलिसांनाच आव्हान दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळे येथील चाळीसगाव रोडवरील अविष्कार कॉलनीतील एसआरपीएफ जवानबअवेज अश्फाक शेख यांचे अमळनेर येथील नातेवाईक हाजी गणी यांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेला 25 रोजी धुळे येथून दुचाकीने (क्र एमएच- 18, एबी-1365) आले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून ते अमळनेर येथून  रात्री 10.30 वाजता   दुचाकीने धुळे येथे जात असताना जानवे गावाच्या अलीकडे सुमारे 10.45 वा मागून दुचाकीवर येणार्‍या तिघांपैकी एकाने थांब, असा आवाज दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यांनी दुचाकी जवळ एकाने जवानाच्या दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे त्यांचा तोल गेल्याने त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. लगेच त्यातील वय 25 ते 30 वर्ष सडपातळ बांधा उंची 5 फूट 5 उंच शर्ट पॅन्ट घातल्याने पिस्तुल काढून जवानाच्या डोक्याला लावून मोबाईल आणि पाकीट हिसकावून घेतले. पाकिटात 3000 रुपये रोख एटीएम कार्ड व ड्रायव्हिंग लायसन व इतर ओळखपत्र होते. तसेच मोटरसायकलची चाबी काढून घेतली. त्यांना विरोध केला असता दुसरा 20 ते 22 वर्ष टी शर्ट व पॅन्ट घातलेल्याने कमरेस धरून त्याच्या कडील चाकु कमरेला लावून  मोबाईल फोन हिसकावून घेतला.तसेच बोटातील चांदीची अंगठी काढून घेतली. तिसरा 20 ते 25 वयोगटाच्या तरुणाने  लाकडी दांड्याने मारले. त्यानंतर तिघे लाल रंगाच्या मोटरसायकलने पळून गेले. गेले. हे तिन्ही लुटारू मराठी भाषिक होते. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर कलम 394,323,506,34 आर्म 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गंभीर शिंदे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button