नितीनची अंगणवाडीसेविकेवर फिरली निती, बाईचा हात धरून केला विनयभंग

अमळनेर (प्रतिनिधी) भागवत सप्ताहाच्या मिरवणुकीत अंगणवाडीसेविकेचा हात धरून विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील लोणसीम येथे १९ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील लोण सिम येथील नितीन केशवराव पाटील याने विनयभंग केला.  यापूर्वी अंगणवाडी सेविकेने १२ रोजी त्याचा भाऊ पोलिस पाटील कांतीलाल पाटील याला नितीन त्रास देत असल्याची तक्रार  केली होती. त्यावेळी त्याने तुझ्याकडून जे होईल ते करून घे असे सांगितले. तर त्याची आई प्रमिलाबाई हिलाही तक्रार केली. तिने देखील तू राजीनामा देऊन माहेरी निघून जा, असे सांगितले होते. त्यांनंतर देखील त्याने त्रास दिल्यावरून मारवड पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *