अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे २१ रोजी इंधन, गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आंदोलनास सुरुवात होणार आहे.
आंदोलनात निष्क्रिय केंद्र सरकार विरोधात त्यांच्याच पद्धतीचे आंदोलन उभे करून जाब विचारायचा आहे. यासंदर्भात प्रांत व तहसीलदार यांना निवेदन द्यावयाचे आहे. या आंदोलनात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी रेस्ट हाऊस जवळ एकत्र यावे, असे असे आवाहन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अलका उत्कर्ष पवार यांनी केले आहे.