अमळनेर पालिकेला मिळणार सामाजिक नेतृत्व असलेला उच्च शिक्षित नगराध्यक्ष !

निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे दिले आदेश

 

सन २०१६ च्या निवडणुकीत निघालेले एस.टी प्रर्वागाचे आरक्षण कायम होण्याचे सुतोवाच

 

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यातील मुदत संपणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध करताच अमळनेर शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शहराच्या मिनीमंत्रालयासाठी शुक्रवार हा ‘गुड फ्रायडे’ ठरत सन २०१६ च्या निवडणुकीत निघालेले एस.टी प्रर्वागाचे आरक्षण कायम होण्याचे सुतोवाच मिळाल्याने अमळनेर पालिकेला प्रथमच सामाजिक नेतृत्व असलेले उच्च शिक्षित नगराध्यक्ष मिळण्याचे राजकीय गणिते मांडले जाऊ लागले. यासह भावी नगराध्यक्षांची काही नावेही सोशल मीडियात फिरू लागली आहेत.

शहराचा विकास साधण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे नगरपालिकेवर वर्चस्वासाठी सर्वच राजकीय पक्षांचा डोळा असतो. त्यात अमळनेरच्या नगरपालिकेकडे विशेष लक्ष लागून असते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १४ जुलै २०१५ रोजी अमळनेर नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमातीाठी जाहीर झाले होते. मात्र शासनाने लोकनियुक्त नगराध्यक्षाची निवड घेतल्याने हेच आरक्षण आता कायम ठेवले जाईल, असे संकेत मिळू लागले आहेत. त्यात मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी केले. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे येऊन तसेच ते सोशस मीडियावर व्हायरल होताच अमळनेरच्या नगरपालिका निवडणुकीचे वारेही शहरभर वाहू लागले आहेत. तर अमळनेरचे आगामी नगराध्यक्ष एस टी राखीव असेल या चर्चेसह भावी नगराध्यक्षांची काही नावेही सोशल मीडियात फिरू लागली आहेत.

२३ ऑगस्टपासून कच्च्या आराखड्याचे काम

 

राज्यातील डिसेंबर २०२१ व फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी २३  ऑगस्ट २०२१ पासून प्रारूप प्रभाग नगर रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे राज्य निवडणूक आयोगान पत्रात म्हटले आहे. यामुळे गल्लीबोळात वार्ड रचनेबाबत इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी चर्चा सुरू केली. वॉडची तोडफोड झाल्यास कोणाला काय आणि कोणता तसेच कसा फायदा होईल, याची आराखडे बांधले जात आहे. तसेच नगरपालिका निवडणूक ही राजकरणात सक्रीय होण्यासाठी महत्वाची असल्याने अनेक युवक ती लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचेही प्रभाग रचनेकडे विशेष लक्ष लागून आहे.

नगराध्यक्षासाठी उच्च शिक्षित चेहरा अघाडीवर

राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आरखडा तयार करण्याचे आदेश देतातच दुसरीकडे अमळनेर नगरपरिषदेचे संभाव्य नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याबाबतचे शासनाच्या नगरविकास विभागाचा १४ जुलै २०१५ तारखेच्या शासन निर्णयाची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे अनुसूचित जामातीच्या प्रवर्गातील भावी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा घडू लागली आहे. त्यात सर्वात अघाडीवर विद्यार्थी जीवनापासून विद्यार्थी, सामाजिक चळवळीसह राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात दोन दशकांपासून सक्रिय असलेले पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे आंदोलनकर्ते असलेले सुपरिचित हाडाचे  आणि हळव्या मनाचे आणि तेवढेच शिस्तप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे पुढे आहेत. शहराची दशा आणि दिशा बदलण्याची धमक शिंदे यांच्यात आरक्षणानुसार त्यांना संधी मिळण्याची अनेकांना खात्री आहे. त्यानंतर अनुसूचित जमातीच्या वार्डमधून निवडून आलेले आजी माजी नगरसेवक संजय पारधी, साहेबराव पवार, शांताराम साळुंखे यांचीही नावेही नगराध्यक्षपदासाठी घेतली जात आहेत. आगामी काळात आरक्षणाबाबत काय निर्णय होतो, हे ठरेलच पण आजच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या नावाच्या चर्चेने अमळनेर ढवळून निघाले, हे तेवढेच खरे आहे.

सयाजीराव की उच्चशिक्षित तरुण ?

नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होण्याआधीच नगराध्यक्ष पदाच्या चर्चेत अमळनेरकरांना अधिक रस असल्याचे दिवसभराच्या राजकीय चर्चेतून स्पष्ट झाले आहे. अमळनेर नगरपालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सुरेश ललवाणी यांच्या काळापासून नगराध्यक्ष केंद्रित झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकित राजकीय नेते नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराचा चेहरा सर्वपरिचित उच्च शिक्षित, निर्णय घेण्याची क्षमता असलेला आणि शहराच्या विकासाला दिशा देणाऱ्या उभरत्या नेतृत्वाला देतील की हाताखालचे बाहुले असलेला सयाजीरावला देतील यावरही निवडणुकीची आणि शहराच्या विकासाचीही दिशा अवलंबून असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *