संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम पाटील यांनी मनसेला दिले आव्हान
अमळनेर (प्रतिनिधी) राज ठाकरे यांनी पुरंदरेंचे समर्थन करताना जेम्स लेनच्या मुद्द्यावर भाष्य करुन पुरोगामी संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. महाराष्ट्रात जातीवाद पसरवल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी काही मुद्दे उपस्थित केले. म्हणून पुण्याच्या कात्रज भागातील एका मनसे पदाधिकाऱ्याने त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करु, असे आव्हान दिले आहे. पुणे शहर हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. संभाजी ब्रिगेड मुद्द्याला मुद्द्याने आणि वेळ पडल्यास गुद्द्याला गुद्द्याने उत्तर द्यायला सक्षम आहे, असे आव्हान संभाजी ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्याम जयवंतराव पाटील यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी जेम्स लेनच्या मुद्द्यावरुन मराठा तरुणांना ब्राह्मणांविरुद्ध भडकवण्याचे डिझाईन तयार केले. तर पुरंदरे ब्राह्मण असल्याने त्यांना विरोध केला जातो, असा ते कांगावा करतात. त्यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.पुरंदरेंनी मांडलेल्या शिवचरित्रामध्ये छत्रपती शिवरायांना एका धर्मापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे शिवजयंतीच्या तारीख तिथीचा वादही महाराष्ट्रात पुरंदरेंनीच निर्माण केला आहे . महाराष्ट्रात पुरंदरेंना होणारा विरोध या कारणांमुळे आहे. राज ठाकरे यांनी पुरंदरेंचे समर्थन करताना जेम्स लेनच्या मुद्द्यावर भाष्य करुन पुरोगामी संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती . महाराष्ट्रात जातीवाद पसरवल्याचा आरोप केला होता . त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे काही मुद्दे उपस्थित केले आहेत, असे श्याम पाटील यांनी म्हटले आहे.