खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

अमळनेर मतदार संघातील रस्त्यांना  मिळाला प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना  यश, रस्ते सुसाट होऊन विकासाला येणार वेग

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर मतदार संघातील जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाला आहे. यामुळे दळणवळणाचा वेग वाढून विकासाला चालणा मिळणार आहे. यासाठी आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केले होते. तसेच जिल्हा परिषदेचा ठराव देखील बांधकाम विभागाला दिला होता. याद्वारे मतदारसंघातील रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा शासनाने दिला आहे. यासंदर्भातील आदेश प्राप्त झाला आहे.
यामध्ये मांडळ, जवखेडा, अनोरा, आर्डी, पिंपळे खु., पिंपळे बु.,मंगरूळ, शिरूड, कावपिंप्री ते प्रजिमा ४९ (आंबपिंप्री फाटा) ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग  १२९ म्हणून नव्याने मान्यता मिळाली आहे.
तसेच हेडावे, रडावन, चिखलोद खु.,शेळावे खु.,शेळावे बु.,धाबे उन्नत, हिरापूर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला मिळणारा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १३० म्हणून नव्याने मान्यता मिळाली आहे.  रस्ते विकास योजना २००१-२०२१  मधील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत ५०.५०० की.मी. ने वाढ झालेली आहे. यामुळे अमळनेर मतदार संघातील हे रस्ते आता जिल्हा मार्ग म्हणून ओळखले जाणार  असल्याने आता हे रस्ते दर्जेदार होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button