रुग्णालयात आलेल्या महिलेचा हात धरून विनयभंग, गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) मुलाला रुग्णालयात घेऊन आलेल्या महिलेचा एकाने हात धरून विनयभंग केल्याची घटना ६ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील कुंटे रोडवरील हितांश हॉस्पिटलज‌वळ घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील माळीवाड्यातील २८ वर्षीय महिला आपल्या मुलाला कुंटे रोड वरील हितांश हॉस्पिटलला आणले असता डॉ सचिन काटे यांनी तपासणी केल्यानंतर ती ओट्यावर बसली होती. या वेळी माळीवाड्यातील देविदास आत्माराम महाजन याने येऊन तिचा हात धरून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून देवीदास महाजन यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल आलोक साबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *