बेकायदा सह्यांसह वेतनवाढीचा ही गफला, स्वतःची प्रॉपर्टी समजून नपाचा माल हापला

कतर्व्य दक्ष सीओ प्रशांत सरोदे आता तरी गुन्हा दाखल करतील का ?

 

गुन्हा दाखल न झाल्यास ‘खबरीलाल’ रिट याचिका  दाखल  करणार..

 

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेत ओव्हरसियर असलेल्या संजय पाटील यांचा नगर अभियंता म्हणून बेकायदा सह्यांच्या किस्साबरोबरच वेतनवाढीचाही गफला समोर आला आहे. हे सारे होत असतानाही नगरपालिकेचा कारभार पाहणाऱ्या महाभारतातील ध्रुतराष्टांना (अंध) संजयच्या डोळ्यांनी सर्वकाही बरोबर असल्याचे कसे दिसले, का त्यांनीही गांधारी सारखी नुसतीच पट्टी बांधून जनतेला वेड्यात काढत नगरपालिका लुटाचा शकुणी डाव खेळला, हे आता सारे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी समितीतून बाहेर येणारच आहे. तर कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे कुणावर गुन्हा दाखल करतील, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी जनतेच्या पैशांची लुट करणाऱ्यांच्याविरोधात खबरीलाल एक पाऊल पुढे टाकत रिट याचिकाच दाखल करणार आहे.
अमळनेर नगरपालिकेतील ओव्हरसियर संजय पाटील यांनी नगर अभियंता म्हणून अनेक वाढीव अंदाज पत्रकांवर सह्या करून बिले काढली. यातून ठेकेदारही गब्बर झाले आहेत. हा सारा प्रकार आणि तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्याने त्यात तथ्य असल्यामुळेचे त्यांनी चौकशी समिती नेमूण संजय पाटील यांचे अधिकार गोठवले आहेत. तसेच नगरपालिकेवर ताशेरे देखील ओढले आहेत. ऐवढेच नव्हे तर या महाशयांनी खूप काही इंक्रीमेटही घेतल्या आहेत. वेतन आणि भत्तेही जादा घेतले आहेत. याबाबत ऑडीटरने ही त्रुटी दर्शवल्या आहेत. एकप्रकारे नगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सरळसरळ शासनाची आणि नागरिकांची ही फसवणूक असून जनतेच्या पैशावर त्यांनी दरोडाच टाकला आहे. या दरोड्यात संजय पाटील समोर दिसत असले तरी त्यात कोण कोण सहभागी आहे, अधिकारी, पदाधिकारी, राजकारणीही असतील तर त्यांचा बुरखा फाडण्याची वेळ आली आहे.  त्यामुळे संजय पाटील यांनी बेकायदा काढलेली बिले, केलेली कामे, वाढीव वेतन भत्ते आदींची १००% रिकव्हरी झाली पाहिजे. अमळनेकरांच्या घामाच्या पैशाने चालणाऱ्या नगरपालिकेने नागरिकांना एक एक पै चा हिशोब दिला पाहिजे. नागरिक सुविधा देण्यासाठी प्रामाणिकपणाने कर भरतात. अशा खादाड-खाऊंचा गल्ला भरण्यासाठी कर भरत नाहीत, म्हणून सीओंनी गुन्हा दाखल केला नाही तर खबरीलाल स्वतः नागरिकांचे नेतृत्व करीत रिट याचिका दाखल करून पापाचा जिरवलेल्या सर्व पैशांची रिकव्हरीसाठी आग्रही राहणार आहे.

ऑडिटरनेही मारला शेरा….

संजय तुकाराम पाटील यांचे सब ओव्हरसियर हे पद प्रस्तावित सुधारित आकृती बंध २४/८/२००५ नुसार एकाकी स्वरुपाचे आहे. शासन निर्णय क्र. वित्तीय विभाग क्रमांक ११-९/प्र.क्र.४३ सेवा -३ तसेच वित्त विभागाकडील शासन निर्णय दि. ३१/८/२००९, दि. १/४/ २०१० व ६ सप्टेंबर २०१४ नुसार वेतन निश्चिती न केल्याने पाटील यांना देय वेतनश्रणी ५२००-२०२०० ग्रेड पे ३४०० ऐवजी वेतनश्रेणी ९३००-३४८०० मूळपदाचे ग्रेडपे ४३०० मंजूर केल्याने त्यांना वेतन भत्ते रक्कम ६९९७४ रुपये जादा प्रदान केली आहेत, असा शेरा ऑडीटरने मारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *