खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग महिलेस, पती, जेठलाही मारहाण

शिरसाळे येथील घटना, मारवड पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल

 

अमळनेर (प्रतिनिधी)  घरात घुसून महिलेचा पदर ओढून विनयभंग करीत पोटावर लाथ मारून ब्लाऊज फाडले. तसेच हाताने तोंड दाबून तिचा विनयभंग करीत तिला सोडण्यासाठी आलेल्या पती, जेठ सह इतरांना चौघांनी मारहाण केल्याची घटना २८ रोजी सायंकाळी साडे सहा वाजता शिरसाळे येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील शिरसाळे येथील एक २७ वर्षीय महिला ही सायंकाळी घरी एकटी असताना केशरलाल उर्फ भाऊ युवराज कोळी याने  घरात घुसून पदर ओढून विनयभंग केला. महिलेने ओरडून पळ काढल्यावर पोटावर लाथ मारून ब्लाउज फाडले आणि हाताने तोंड दाबले. त्याचवेळी महिलेचा जेठ श्यामकांत चुडामन जाधव, राकेश दिलीप जाधव, जितेंद्र गंभीर जाधव यांनी महिलेची सुटका केली. केशरलाल याने श्यामकांत जाधव यांनाही लाथा बुक्क्यांनी  मारहाण केली. या गोंधळात केशरलालचा चुलत भाऊ विजय सुरेश कोळी, वडील युवराज भाऊलाल कोळी, काका सुरेश भावलाल कोळी यांनी येऊन महिलेच्या जेठ, पती व इतरांनाही मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला गावात राहणे मुश्किल करून देऊ अशी धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विशाल चव्हाण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button