खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

इलेक्ट्रीक मोटर सुरू करताना विजेचा  धक्का लागून कळमसरे येथे एकाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) गुरांना पाणी पाजण्यासाठी इलेक्ट्रीक मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तालुक्यातील कळमसरे येथील एकाचा मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारस घडली. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील कळमसरे येथील दिलीप मगन न्हावी (वय ५५) हे २९ रोजी दुपारी दीड वाजता गुरांना पाणी पाजण्यासाठी इलेक्ट्रीक मोटर सुरू करीत होते. यावेळी त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button