खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी चोरी

अमळनेर (प्रतिनिधी) शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी चोरीस गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील योगेश मधुकर पाटील हे दुचाकीने (एमएच-१९ एए- ७६४२) शिवाजी उद्यानात फिरण्यासाठी आले होते. त्यांनी दुचाकी उद्यानाजवळ लावली होती. उद्यानात फिरून झाल्यानंतर ते सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता ती चोरीस गेल्याचे दिसून आले. दुचाकीची किंमत १५ हजार रुपये असून त्यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button