अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु गुरुवारी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे. त्यामुळे अमळनेकरांना आतापासूनच सावध होण्याची गरज आहे.
अमळनेर हे सुरुवातीपासून कोरोना हॉटस्पॉट असल्याने या तालुक्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना शिथिलता दिल्याने नागरिक व व्यापाऱ्यांकडून काहीअंशी दुर्लक्ष होत आहे. तसेच शहर कोरोनामुक्त झाले असताना गुरुवारी पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा प्रशासकीय अधिकारी सावध झाले आहे. तर अनेक जण ही तिसऱ्या लाटेची घंटा असल्याचे सांगत असून नागरिकांना आतापासून सावध होत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करण्याकरीता प्रशासनास आणि आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.