५ हजार रुपये रोखसह ३६ हजारांचा ऐवज केला लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) मुलाला दवाखाण्यात घेऊन गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी भरदिवसा डल्ला मारल्याची घटना २६ रोजी दुपारी जीएस हायस्कूल मागील अनुराधा अपार्टमेंट मध्ये घडली. याच चोरट्यांनी ३६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र कन्हैय्यालाल नांदोडे हे सेवानिवृत्त शिक्षक मुलगा अमोल याला २६ रोजी धुळे येथे उपचारसाठी पत्नीसोबत दवाखाण्यात घेऊन गेले होते. दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोंडा तोडून घरातील ३ हजार ५०० रुपये किमतीचे ३ ग्राम वजनाचे मणी मंगळसूत्र, ३ हजार रुपयांच्या चांदीच्या साखळ्या, १५ हजार रुपयांची ५ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी , ७ हजार ५०० रुपयांचे अडीच भार चांदीचे बेले , अडीच हजार रुपये किमतीचे सहा चांदीचे नाणे, ५ हजार रुपये रोख असा एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला आहे. नांदोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहेत.